Rizvi College: पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू!

893
Rizvi College: पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू!
Rizvi College: पिकनिकसाठी गेलेल्या मुंबईतील कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा रायगडमध्ये बुडून मृत्यू!

मुंबईतील वांद्रे येथील रिझवी कॉलेजच्या (Rizvi College) विद्यार्थ्यांची पावसाळी सहल खालापूरला (Khalapur) गेली होती. यातील चार विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. खालापूर तालुक्यातील वावर्ले ग्रामपंचायत हद्दीतील पोखरवाडी येथील सत्य साई बाबा धरणात हे तरुण बुडाले. महाविद्यालयातील ३७ तरुण-तरुणी सहलीला गेले होते. खालापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एकलव्य सिंग, इशांत यादव, आकाश माने आणि रणत बंडा, अशी बुडालेल्या चौघांची नावं आहेत. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं आहे. (Rizvi College)

पावसाळी सहलीला जाणे चार तरुणांच्या चांगलंच जीवावर बेतलं

पावसाळी सहलीला जाणे चार तरुणांच्या चांगलंच जीवावर बेतलं आहे. वांद्रे पूर्वमधून सहलीला गेलेल्या तरुणांना खालापूरच्या तलावात पोहण्याच्या मोह झाला. यातील चार तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. अन्य तरुणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. एकाला अत्यवस्थ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तरुण वांद्र्याच्या रिझवी कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. या कॉलेजचे एकूण ३७ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खालापूरमध्ये फिरायला आले होते. (Rizvi College)

चार ही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला. खालापूर तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे घटनास्थळी होते. (Rizvi College)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.