RMC Plant : मुंबईसह आसपासच्या विभागातील सिमेंट काँक्रिट प्लांट आणि रेडीमिक्स वाहनांवर बंदी

812
RMC Plant : मुंबईसह आसपासच्या विभागातील सिमेंट काँक्रिट प्लांट आणि रेडीमिक्स वाहनांवर बंदी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करुनही वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक आढळून येत असल्याने मुंबईसह महानगरातील प्रदूषणकारी रेडीमिक्स काँक्रिट प्रकल्प, हॉट मिक्स प्लांट बंद परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत बंद करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांनी स्पष्ट केले.

प्रदूषणकारी रेडीमिक्‍स काँक्रिट वाहनांवर कार्यवाही करण्याचे निर्देश सहपोलिस आयुक्त (वाहतूक) यांना देण्यात आले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत रेडीमिक्‍स काँक्रिट प्रकल्‍प, स्टोन क्रशर, हॉट मिक्स प्लांट हे बंद केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आरएमसी प्लाँटना नोटीस देण्यात येत असून त्यांना सर्व प्रकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. तीन महिन्यांमध्ये हे सर्व कव्हर करायचे असून त्यानंतर प्लांट सुरु करण्यास परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (RMC Plant)

सातत्याने वायू गुणवत्ता निर्देशांक २०० पेक्षा अधिक राहिल्यास कठोर पावले उचलली जाणार असून विविध उपाययोजना राबवूनदेखील वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) जर सातत्याने २०० पेक्षा जास्त जात असेल तर त्या परिसरातील कारणीभूत उद्योग आणि बांधकामे Graded Response Action Plan (GRAP-4) अंतर्गत बंद करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Arunachal Pradesh मध्ये जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी लागू होणार धर्मस्वातंत्र्य कायदा)

मुंबई एअर अॅपवर ४१२ तक्रारी

वायू प्रदूषणासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी फेब्रुवारी, २०२३ पासून ‘मुंबई एअर अॅप’ उपलब्ध. या अॅपवर आतापर्यंत ४१२ तक्रारी प्राप्त. पैकी ३५० तक्रारींचा निपटारा. तर, २६ तक्रारी या महानगरपालिका कार्यक्षेत्राबाहेरील. अन्य ३६ तक्रारींवर कार्यवाही सुरु असल्याचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.

उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई

दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३ ते १० डिसेंबर, २०२४ या कालावधीत उघड्यावर कचरा जाळण्याच्या ३५२ घटनांवर दंडात्मक कार्यवाही. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वातावरणातील प्रदूषणात मोठ्याप्रमाणात वाढ होत असल्याने अशाप्रकारच्या घटनांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. (RMC Plant)

वर्षभरात सुमारे ५ हजार ८२० किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुतले

रस्त्यावरील धूळ आटोक्यात आणण्यासाठी ५ हजार लीटर क्षमतेचे ६७ टँकर्स आणि ९ हजार लीटर क्षमतेचे ३९ टँकर्स दररोज वापरात आहेत. याद्वारे १३ नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत म्हणजे मागील वर्षभरात सुमारे ५ हजार ८२० किलोमीटर लांबीचे रस्ते पाण्याने धुतले गेले आहेत. हवेतील धूळ नियंत्रणासाठी रस्त्यावर मिस्टींग मशीनचा वापर करण्यात येत असून त्याद्वारे १३ नोव्हेंबर २०२३ ते २० डिसेंबर २०२४ रोजीपर्यंत म्हणजे मागील वर्षभरात सुमारे ३ हजार ३११ किलोमीटर लांबी होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. वायू प्रदूषणाचे स्रोत ओळखून उत्सर्जन सूची अद्ययावत करण्यासाठी डिसेंबर २०२४ मध्ये ‘ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’ (एआरएआय) यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (RMC Plant)

(हेही वाचा – नाराज Chhagan Bhujbal ‘थर्टी फर्स्ट’साठी परदेशवारीवर?)

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष स्वच्छता मोहीम हाती

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी २५ डिसेंबर २०२४ पासून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून रस्त्यावरील धूळ यंत्राद्वारे हटवणे, राडारोडा (डेब्रिज) च्या वाहतुकीवर विशेष कारवाई करण्यात येत आहे, तसेच दंडात्मक कारवाई, धूलिकण प्रतिबंधासाठी पाण्याची फवारणी, रस्ते स्वच्छता यांचा समावेश आदी कामांचा समावेश आहे.

रस्ते पाण्याने धुतले

मागील २५ डिसेंबर पासून आतापर्यंत १,२५२ किमी. लांबीचे ६३४ रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले आहेत. यासाठी पाण्याचे ४८० टँकर, मिस्टिंग मशीन, फायरेक्स मशीन्स आदींचा वापर करण्यात येत आहे. (RMC Plant)

धूळ मुक्तीसाठी

रस्त्याच्या कडेला असणारी ३४२ टन धूळ, माती स्वीपिंग मशीन्सद्वारे गोळा करण्यात आली असून वर्दळीच्या व प्रमुख रस्त्यांवर विभागवार एकूण २४ मिस्टिंग संयंत्रांद्वारे सूक्ष्म धूलिकण नियंत्रणासाठी वापण्यात येत आहे. तसेच १६ मेकॅनिकल स्वीपर व इ-स्वीपरद्वारे रस्त्यावरील धूळ गोळा करण्यात येत आहे.

राडारोडा (डेब्रिज) नियंत्रणासाठी

राडारोडा विल्हेवाटीसाठी ४४८ डंपर, इ-स्वीपर, मेकॅनिकल स्वीपर, लिटर पीकर मशीन सारखी विविध संयंत्रे वापरात असून ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, रस्त्याचा कडेला साठवलेला ९३९ टन बांधकामाचा राडारोडा उचलण्यात आला आहे. २४ वॉर्डनिहाय भरारी पथकांमार्फत अनधिकृत डेब्रिज वाहतुकीवर प्रतिबंध घालून २,१३,००० रुपये एवढी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध डेब्रिजवर लक्ष ठेवण्यासाठी विभागांत ३५० पेक्षा अधिक क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले आहे. (RMC Plant)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.