1 कोटीचा रस्ता बांधला अन् उद्घाटनावेळीच खड्डा पडला

144

नवे रस्ते बांधले आणि त्या रस्त्यांवर काही दिवसांतच खड्डे पडल्याचे आपण पाहिले असेल, पण 1 कोटी 16 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे उद्घाटन करतानाच खड्डा पडला तर..ही जितकी हास्यास्पद बाब आहे, त्याहून जास्त गंभीरही आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या या घटनेनंतर आता प्रशासनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये नव्याने बांधलेल्या रस्त्याच्या उद्घाटनावेळी नारळ वाढवताना रस्ता फुटला, पण नारळ काही फुटला नाही. रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या आमदार सुची मौसम चौधरी या त्या रस्त्यावरचं आंदोलनाला बसल्या. तसेच त्यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये उद्घाटनावेळी नारळ वाढवताना नव्याने बांधलेल्या रस्त्याला खड्डा पडल्याने सरकारी यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. उद्घाटनासाठी पोहोचलेल्या आमदार सुची मौसम चौधरी यांनी प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पाटबंधारे विभागाने हल्दौरजवळील बालकिशनपूर चौकातून जाणाऱ्या कॅनॉल ट्रॅकवर हा रस्ता बांधण्यात आला होता.

आमदारांनी व्यक्त केली नाराजी

शहराच्या आमदार सुची मौसम चौधरी नव्याने बांधलेल्या रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी गेल्या असता, रस्त्यावर नारळ मारताच रस्त्याला खड्डा पडला, पण नारळ काही फुटला नाही. या घटनेने रस्तेबांधणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच नेत्यांचेही हसे झाले आहे. तसेच नवीन रस्त्यावर अशा प्रकारे खड्डा पडल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाला चौकशी करण्याची मागणी केली आहे. याची कसून चौकशी करता यावी, यासाठी आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना रस्त्याचे नमुने घेण्यास सांगितले. या नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यासाठी सुमारे 1.16 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

 ( हेही वाचा :ओमायक्राॅनची धास्ती ! देशात ऑक्सिजन प्लांटसह नवीन रुग्णालये )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.