- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील टप्पा क्रमांक १ मधील उर्वरित कामे, टप्पा २ मधील नव्याने सुरू होणारी सिमेंट काँक्रिटची (Road Cement Concreting) कामे आवश्यक गती राखून व गुणवत्तेत कोणतीही तडजोड न होता सुरू होणे अपेक्षित आहे. ही कामे सुरू करताना प्राधान्यक्रम निश्चित केल्यापासून कामाची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महानगरपालिका अभियंते व आयआयटी चमू (टीम) यांच्यात सुसंवाद ठेवला जावा असे निर्देश महापालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी केले आहे.
मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण (Road Cement Concreting) कामे प्रगतिपथावर आहेत. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबर २०२४ पासून रस्ते विकास कामांना वेग द्यावा. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रस्ते विकासाची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी होत असताना त्याचवेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणीचे कामकाज सुरू करावे. ‘आयआयटी’ने गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
(हेही वाचा – Love Jihad : आनंद असल्याचे भासवणाऱ्या आलिमच्या वासनेची ‘ती’ ठरली शिकार, न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा)
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण (Road Cement Concreting) करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील रस्ते कामांचा समावेश आहे. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी त्रयस्थ संस्था (थर्ड पार्टी) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५ पॅकेज (शहर विभाग १, पूर्व विभाग १ आणि पश्चिम विभाग ३) आणि पहिल्या टप्प्यातील १ पॅकेजच्या कामांची गुणवत्ता तपासणी व अनुषंगिक कामे भारतीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत केली जाणार आहेत.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी रस्ते व वाहतूक विभागातील प्रमुख अधिकारी, अभियंते यांची महत्त्वपूर्ण बैठक ३० सप्टेंबर २०२४ रोजी महानगरपालिका मुख्यालयात घेतली. भारतीय तंत्रज्ञान संस्था यांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी आयआयटीच्या प्रतिनिधींनी प्रमाणित कार्यपद्धतीचे सादरीकरण केले.
(हेही वाचा – Nair Hospital चे डिन डॉ. मेढेकर यांची कुपरमध्ये बदली, नायरची जबाबदारी डॉ. शैलेश मोहितेंवर!)
१ ऑक्टोबर २०२४ पासून रस्ते कामांची पूर्वतयारी सुरू होणे अपेक्षित आहे. तसेच, टप्पा क्रमांक १ मधील उर्वरित कामे, टप्पा २ मधील नव्याने सुरू होणारी कामे आवश्यक गती राखून व गुणवत्तेत कोणतीही तडजोड न होता सुरू होणे अपेक्षित आहे. ही कामे सुरू करताना प्राधान्यक्रम निश्चित केल्यापासून कामाची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महानगरपालिका अभियंते व आयआयटी चमू (टीम) यांच्यात सुसंवाद ठेवणे गरजेचे आहे. आयआयटी चमू (टीम) व रस्ते विभाग यामध्ये समन्वय अधिक चांगल्या पद्धतीने होण्याकामी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आयआयटीचे प्रा. के. व्ही. के. राव यांनी कामकाजाची दिशा कशी राहिल, हे सर्वप्रथम स्पष्ट केले व त्यासाठी रस्ते विभागाने आवश्यक माहिती पुरविणे, प्राधान्यक्रमांची यादी पुरविणे, कामे सुरू असताना सामुग्री (मटेरियल) बनविण्याचा कारखाना ते प्रत्यक्ष कार्यस्थळ या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या, आयआयटी चमूच्या नियोजित भेटी यांसाठी परिवहन (लॉजिस्टीक) सहाय्य तसेच आयआयटी चमूला कार्यस्थळी विनासायास प्रवेश मिळावा यासाठीची सुलभता अशा विविध बाबींबाबत रस्ते विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. आयआयटी आणि रस्ते विभाग यांच्यातील समन्वयासाठी समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वय (नोडल) अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दैनंदिन संवाद साधत कामाची गुणवत्ता राखावी, यासाठी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
(हेही वाचा – Solid Waste Management मधील पी. टी. केस प्रकरणांचा लावणार निकाल; गुरुवापासून दक्षिण मुंबईतील कर्मचाऱ्यांसाठी खास शिबिर)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर म्हणाले, रस्ते विकासाची अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक कमी गुणवत्तेचे कामकाज होऊ नये म्हणून दक्षता घेणे, याबरोबरच कामाची अंमलबजावणी करताना अजाणतेमुळे होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन आणि अत्युच्च गुणवत्तेची काळजी घेणे, या सर्व बाबींमध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करेल. रस्त्यांच्या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्य पद्धती निश्चित करण्याकामी आवश्यक सल्ला देणे, प्रत्येक प्रकरणाच्या आधारे आवश्यकतेनुसार तपासणी करणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्ता आश्वासनासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे आणि गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्पस्थळास भेटी देणे इत्यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या कामकाजाच्या व्याप्तीत करण्यात आला आहे.
आकस्मिक भेटी, कार्यस्थळास प्रत्यक्ष भेट देणे, त्याबाबतची निरीक्षणे नोंदविणे, भेटीच्या दरम्यानची निरीक्षणे आणि त्यावरील सल्ला यांबाबत वेळोवेळी अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांसोबत प्रतिसाद मिळवेल. काँक्रिट प्लांटमध्ये मटेरियल बनविण्याच्या टप्प्यापासून ते काँक्रिट रस्त्याचे (Road Cement Concreting) काम पूर्ण झाल्यानंतरच्या विविध चाचण्यांद्वारे भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. त्यात क्युब टेस्ट, कोअर टेस्ट, स्लम्प कोन टेस्ट, ड्युरॅबिलीटी टेस्ट, फिल्ड डेन्सिटी टेस्ट आदी विविध तांत्रिक चाचण्यांचा समावेश आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे, १ ऑक्टोबर २०२४ पासून रस्ते विकास कामांना वेग देण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. या निर्देशांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कामाचा दर्जा, गुणवत्ता यांच्यात हयगय कदापि खपवून घेतली जाणार नाही. महानगरपालिका अभियंते, कंत्राटदार यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना बांगर यांनी दिल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community