Road Jet Cleaning Machine : आता मुंबईत रस्ता स्वच्छतेसाठी अत्याधुनिक रोड जेट क्लिनिंग संयंत्राचा वापर

मुंबईत वायूप्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अत्याधुनिक संयंत्राचा समावेश करण्यात येत आहे. त्याआधारे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते पाण्याचे धुवून काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

1430
Road Jet Cleaning Machine : आता मुंबईत रस्ता स्वछतेसाठी अत्याधुनिक रोड जेट क्लिनिंग संयंत्राच्या वापर
Road Jet Cleaning Machine : आता मुंबईत रस्ता स्वछतेसाठी अत्याधुनिक रोड जेट क्लिनिंग संयंत्राच्या वापर

मुंबईत सध्या सुरू असलेल्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेमध्ये अत्याधुनिक अशा रोड जेट क्लिनिंग संयंत्राचा समावेश करून घेण्याच्या दृष्टीने या संयंत्राचे फॅशन स्ट्रीट परिसरात प्रात्यक्षिक करण्यात आले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत हे प्रात्यक्षिक पार पडले. यामध्ये एकाच वेळी रस्ते स्वच्छता आणि त्यानंतर गाळ व पाणी शोषून घेण्याची क्षमता आहे. यामुळे हे संयंत्र स्वच्छतेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. एवढेच नव्हे तर त्याचे संचालन करणे देखील अतिशय सुलभ असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. (Road Jet Cleaning Machine)

रस्ते पाण्याने धुण्याचे काम वेगात

मुंबईत वायूप्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत अत्याधुनिक संयंत्राचा समावेश करण्यात येत आहे. त्याआधारे मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व प्रमुख आणि अंतर्गत रस्ते पाण्याचे धुवून काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी २ जानेवारी २०२४ रोजी सकाळी फॅशन स्ट्रीट, महात्मा गांधी मार्ग येथे रस्ते स्वच्छतेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) संजोग कबरे, प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांच्यासह घन कचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी-कामगार उपस्थित होते. (Road Jet Cleaning Machine)

(हेही वाचा – Mumbai-Goa Expressway : चौपदरीकरणाच्या कामासाठी सरकारने ठरवली नवी डेडलाईन; कोकणवासीयांची प्रतीक्षा लांबली)

उच्च क्षमतेच्या व्हॅक्यूम प्रणालीचा वापर

हे रोड जेट क्लिनिंग संयंत्र हे अत्याधुनिक स्वरुपाचे आहे. यामध्ये पाण्याचा उच्च दाब जेटिंग व फिरत्या ब्रशची सुविधा आहे. यामुळे रस्ता दुभाजक स्वच्छ करणे, यांत्रिकी झाडूच्या सहाय्याने रस्त्यांची स्वच्छता करणे, संयंत्राच्या मागील बाजूस असलेल्या उच्च क्षमतेच्या व्हॅक्यूम प्रणालीचा वापर करून एकाचवेळी रस्त्यावरील गाळ आणि पाणी शोषून घेणे आदी प्रकारचे प्रात्यक्षिक यावेळी फॅशन स्ट्रीट येथे दाखविण्यात आले. वाहनास मागे पुढे करून स्वच्छतेची यंत्रणा ऑपरेटर सहजपणे नियंत्रित करू शकेल, अशी सुलभ रचना या संयंत्रात आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. (Road Jet Cleaning Machine)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.