Road Manholes : बोरीवलीत मॅनहोल मध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू

142
Road Manholes : बोरीवलीत मॅनहोल मध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू
Road Manholes : बोरीवलीत मॅनहोल मध्ये पडून एका कामगाराचा मृत्यू
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या वतीने रस्त्यांवरील मल: निस्सारण वाहिनी तसेच पर्जन्य वाहिनीचे मॅनहोल्सची योग्य काळजी घेवून त्यात सुरक्षा जाळ्या आणि झाकणे लावण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून,त्यात पावसाळ्यात कुणी पडून कुठलीही अघटीत घटना न घडो. परंतु, एवढी काळजी घेवूनही बोरिवली (Borivali) येथे खासगी कामगारांमार्फत मलवाहिनी साफ करताना एक ३५ वर्षीय कामगाराचा त्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  सिद्धार्थ वाकोडे (Siddharth Wakode) असे मृत तरुणाचे नाव आहे. (Road Manholes)
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वतीने न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्यांवरील तसेच पद पथावरील मल वाहिनी आणि पर्जन्य जलवाहिन्या यांच्या मॅनहोल्सची झाकणे योग्य प्रकारे बसवणे आणि सकल भागांमध्ये जिथे पाणी साचते त्या ठिकाणी मॅनहोल्सची सुरक्षा जाळ्या बसवणे आदी प्रकारची कामे करण्यात आली आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेने नियोजित वेळेत सुरक्षा जाळ्या तसेच मॅनहोल्सची झाकणे बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. तसेच पावसाळ्यात कुठेही मॅनहोल्सची झाकणे खाजगी व्यक्तीला उघडण्यास परवानगी नाकारली असून अशा प्रकारे जर कोणा खाजगी व्यक्तीने  मॅनहोल्सची झाकणे  उघडल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या इशारा दिला असतानाही, गुरुवारी संध्याकाळी बोरीवली पश्चिम  गोखले शाळेसमोर अंबाजी मंदिर जवळ शिंपोली रोड वर मल वाहिनीच्या मॅनहोल्स खाजगी कामगाराच्या माध्यमातून साफ करण्याचा प्रयत्न येथील हॉटेल ताराचंद च्या वतीने झाले. त्यांनी  विनापरवानगी मॅनहोल्स चे झाकण उघडून त्याची सफाई करण्याचे काम हाती घेतले. (Road Manholes)
दुपारी साडेचार ते पाच वाजता हे काम सुरू असताना सफाई करणारा या  मॅनहोल्स च्या आतील बाजूस पडला. त्यानंतर अग्निशमन दल व इतरांच्या मदतीने त्याला बाहेर काढून  काढून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी या कामगाराला मृत घोषित केले. महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्या नुसार,  हे मॅनहोल्स मलवाहिनीचे आहे. हॉटेल ताराचंद च्या वतीने खाजगी कामगारांना बोलावून या मॅनहोल्सची सफाई करण्यात येत होती. या सफाई दरम्यान कामगार मॅनहोल्सची मध्ये पडला गेला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मॅनहोल्सचे झाकण हॉटेलच्या माणसांनी जबरदस्तीने उघडले असे त्यांनी म्हटले आहे. (Road Manholes)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.