- सचिन धानजी,मुंबई
मुंबईत सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे लवकरात लवकर खड्डे भरण्यासाठी यंदा मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून या मास्टिकचा वापर करण्याबाबतची पद्धती कंत्राटदारांना सांगण्यात आली आहे. मात्र, या मास्टिकचा वापर योग्य प्रकारे होत नसून ज्याप्रकारे कोल्डमिक्सचा वापर केला जात होता, तसाचा वापर आता मास्टिकचा वापर खड्डे बुजण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे मास्टिकने बुजवलेल्या खड्ड्यांमध्ये एकसमानता आणि समांतरता येत नाही. परिणामी अनेक ठिकाणी खड्डे सदृश्य स्थिती निर्माण होऊन त्यात साचल्या जाणाऱ्या पाण्यामुळे नागरिकच हैराणले आहेत. त्यामुळे महापालिका खड्डे बुजवते की खड्डे निर्माण करते असा प्रश्न आता जनतेला पडलेला आहे. (Road Pothole)
रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, रिऍक्टीव्ह अस्फाल्ट, कोल्ड मिक्स, मास्टिक अस्फाल्ट आदींचा प्रयोगशील वापर मागील दोन वर्षांमध्ये करण्यात आला असला तरी यंदा रस्त्यांवरील हे खड्डे बुजवण्यासाठी एकमेव मास्टिक अस्फाल्टचाच वापर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचा वापर केला जात असून यासाठी ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. (Road Pothole)
(हेही वाचा – Shri Shivrajyabhishek Sohala ला शासकीय मान्यता; श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीला यश)
प्रत्येक वॉर्डात खड्ड्यांसाठी सरासरी ४ कोटींचा खर्च ?
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती कामांसाठी महापालिकेच्या ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी स्थानिक वॉर्डच्या पातळीवर आणि ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी रस्ते विभागाच्या अखत्यारित अशाप्रकारे स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ज्यामध्ये ९ मीटरच्या खालील रस्त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये आणि ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत खर्च केला जाणार आहे. (Road Pothole)
मात्र, यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून खड्डे बुजवण्यासाठी खड्ड्यांचा नेमून दिलेल्या पद्धतीनुसार वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील मरिन लाईन्स येथील डॉ. कासवजी होरमासजी गल्लीतील अफ्रेड रेस्तराँ जवळील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचा वापर करण्यात आला होता. परंतु मास्टिकचा वापर खड्ड्यांच्या ठिकाणी केल्यानंतर तो रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद न करता तसेच बुजवलेल्या भाग बंद न करण्यात आल्याने यावरून वाहने जावून टायरचे छाप त्यावर उमटले. या वाहतुकीमुळे डांबराचा भाग खचला गेला आणि त्यात पावसाचे पाणी जमा होऊन खड्डा सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. (Road Pothole)
तसेच दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाच्या समोरील स्वामी नारायण मंदिर आणि पोलिस चौकी जवळील खराब भागांमध्ये मास्टिकचा वापर केला गेला, परंतु या मास्टिकचा योग्यप्रकारे न टाकल्याने त्यावर खड्डे सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तसेच दादरमधील पोर्तुगिज चर्च जवळील भवानी शंकर रोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्ड्यांच्या जागांवर मास्टिकचा वापर केला गेला. पण मास्टिकने खड्डे बुजवल्यानंतर त्याठिकाणी वाहतुकीसाठी काही काळ बंद न ठेवल्याने त्यावरुन वाहने जावून यावर खड्डेच पडल्याचे अधिक दिसून आले आहे. (Road Pothole)
त्यामुळे अनेक रस्त्यांवर खराब जागांवर मास्टिकचा वापर केला जात असला तरी एकसमान पद्धतीचा अवलंब केला जात नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागावर उंचवटे तसेच खोलगट पणा दिसून येत आहे. परिणामी पावसाचे पाणी यामध्ये जमा होऊन याचा त्रास वाहन चालक आणि जनतेला होत आहे. खड्ड्यांच्या भागांमध्ये मास्टिक अस्फाल्टचा कशाप्रकारेही न करता चौरस आकारात केला जावा अशाप्रकारच्या स्पष्ट सुचना असतानाही कंत्राटदारांकडून या पद्धतीचा वापर केला जात नाही, परिणामी खड्डे बुजवलेल्या भागांमध्ये पावसाचे पाणी जमा होत आहे, असे दिसून येत आहे. (Road Pothole)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community