मुंबईत सततच्या पावसामुळे तयार होणारे खड्डे लवकरात लवकर खड्डे भरण्यासाठी रॅपिड हार्डनिंग काँक्रिट, रिऍक्टीव्ह अस्फाल्ट, कोल्ड मिक्स, मास्टिक अस्फाल्ट आदींचा प्रयोगशील वापर मागील दोन वर्षांमध्ये करण्यात आला असला तरी यंदा रस्त्यांवरील हे खड्डे बुजवण्यासाठी एकमेव मास्टिक अस्फाल्टचाच वापर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मास्टिक अस्फाल्टचा वापर केला जाणार असून यासाठी ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या कामांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. (Road Pothole)
रॅपिड हार्डनिंग काँक्रिटच्या वापरावर भर
मुंबईतील खड्डे भरण्यासाठी सध्या कोल्डमिक्स, मास्टिक एजन्सी आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट अशा तीन पद्धतींमधून काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची रूंदी किती आहे, कोणाच्या हद्दीतील किंवा कोणाच्या मालकीचा रस्ता आहे, या बाबी तूर्त मागे ठेवून सर्व खड्डे बुजवण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व उन्नत महामार्ग याठिकाणी रस्त्यांची स्थिती चांगली आहे. त्यासोबतच मुंबईतील सर्व मुख्य रस्ते आणि सेवा रस्ते याठिकाणीही खड्डे राहणार नाहीत, यासाठी काळजी घेऊन खड्डे दुरुस्तीची काम मागील वर्षांपर्यंत हाती घेण्यात आली होती. विशेष म्हणजे कॉंक्रिट रस्ते आणि डांबराचे रस्ते तसेच दोन रस्त्यांमधील पॅच हे रॅपिड हार्डनिंग काँक्रिटचा वापर करण्यावर भर दिला जात होता. (Road Pothole)
(हेही वाचा – AAP ने खलिस्तानींकडून कोट्यवधी रुपये घेतल्याच्या आरोपाची NIA मार्फत होणार चौकशी)
प्रत्येक वॉर्डात खड्ड्यांसाठी सरासरी ४ कोटींचा खर्च ?
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दोष दायित्व कालावधीत समाविष्ट नसलेल्या विविध रस्त्यांच्या दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दुरूस्ती कामांसाठी महापालिकेच्या ७ परिमंडळांत एकूण मिळून १४ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असल्याचे सांगितले. सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी दोन कंत्राटदारांची नेमणूक केली असून ९ मीटर पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांसाठी स्थानिक वॉर्डच्या पातळीवर आणि ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी रस्ते विभागाच्या अखत्यारित अशाप्रकारे स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ज्यामध्ये ९ मीटरच्या खालील रस्त्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये आणि ९ मीटर पेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत खर्च केला जाणार आहे. (Road Pothole)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community