विशेष प्रतिनिधी,मुंबई शहर
पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध वापरण्यात येणा-या रस्त्यांलगतचे उपड़े छोटे नाले साफ करण्यासाठीरोड साईड ओपन ड्रेन डिसिल्टिंग मशीनचा शासनाच्या नियमानुसार कालबाह्य होत असताना या मशीनची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जास्तीचा दर महापालिका प्रशासनाने देवू केला आहे. विशेष म्हणजे ही मशिन्स पुढील ०९ महिन्यांत कालबाह्य होत असताना त्यासाठी नव्याने निविदा काढण्याची गरज नसतानाही संबंधित विभागाने नव्याने निविदा काढून मशिनच्या प्रत्येक पाळीसाठी एक हजार रुपये अधिक मोजले. यापूर्वी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी नेमलेलीच कंपनी पुन्हा पात्र ठरली आहे, या कंपनीला केवळ ९ महिन्यांपासून प्रत्येक पाळीसाठी सुमारे एक हजार रुपये अधिक मोजावे लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या शहर पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे क्षेत्रात रस्त्यालगत अनेक छोटे उघडे नाले आहेत. या नाल्यांमधून गाळ, मल, गवत तसेच तरंगत्या वस्तू इत्यादी वाहून येतात, त्यामुळे या नाल्यांची सतत साफ-सफाई करावी लागते. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील रस्त्यांलगतचे उघडे छोटे नाले साफ करण्यासाठी या विभागाकडे हायड्रॉलिक तत्त्वावर चालणा-या एकूण १७ मशिन्स रोड साईड ओपन ड्रेन डिसिल्टिंग करता असून या मशिन्सद्वारे शहर व उपनगरांमधील रस्त्यांलगतच्या अनेक छोट्या नाल्यांच्या साफ-सफाईचे काम केले जाते.
या १७ रोड साईड ओपन ड्रेन डिसिल्टिंग मशिन्सपैंकी १० मशिन्सच्या देखभाल व दुरुस्तीचे काम जय मल्हार हायरिंग सर्विसेस यांना देण्यात आले आहे. या कंपनीचा कंत्राट कालावधी शिल्लक आहे. तर उर्वरीत ०७ मशिन्सच्या देखभाल व दुरुस्तीचे काम साज इंटरप्रायजेस या कंत्राटदारांमार्फत करण्यात येते. मात्र, हे कंत्राट १५ जुलै २०२३ रोजी संपुष्टात आले असून या सर्व मशिन्सची आर.टी.ओ. नोंदणीही रोजी संपुष्टात येणार आहे.
त्यामुळे आरटीओची नोंदणी संपुष्टात येण्यापूर्वी या०७ मशिन्सची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी नव्याने कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये ९ महिन्यांच्या कालावधीसाठी या मशिन्सची देखभाल करण्यासाठी साज एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली आहे. त्यामुळे ज्या कंपनीकडे आधीच्या तीन वर्षांची देखभालीची जबाबदारी होती. या कालावधीसाठी १ कोटी २५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचा-Rain : मुंबई मध्ये पावसाची जोरदार बॅटींग ,अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद)
याच कंपनीने पूर्वी प्रति पाळीसाठी ६,५९७ रुपये एवढा दर आकारला होता, तर ९ महिन्यांसाठी काढलेल्या या निविदेमध्ये ७,६६० रुपये एवढा आकारला आहे. म्हणजे तब्बल १०६३ रुपये अधिक रुपये प्रति पाळीसाठी मोजले जाणार आह. एकाबाजुला अनेक देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी नेमल्या जाणाऱ्या कंपन्यांना निविदा लांबणीवर टाकून त्यांना जुन्याच दराने काम देत महापालिकेचा फायदा होत असल्याचे सांगत युक्तीवाद केला जातो. त्यामुळे याठिकाणी केवळ ९ महिन्यांसाठी पुनहा त्याच कंपनीकडून काम करून घेणे अपेक्षित असताना त्यासाठी नव्याने निविदा मागवून त्यांना अधिक दर मिळवून देण्याचा प्रयत्न पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे जी कंपनी आता पात्र ठरली आहे त्याच कंपनीकडे आधीचे कंत्राट होते. त्यामुळे आता पात्र ठरलेल्या कंपनीकडून जुन्याच दराने काम करून घेण्यासाठी वाटाघाटी करून काम देताही आले असते. आरटीओची नोंदणी संपत असल्याने त्यांना पुढील ९ महिन्यांकरता वाढवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची हरकत नसताना नव्याने निविदा मागवून एकप्रकारे कंत्राटदाराला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेचे सुमारे १६ लाखांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community