Amarnath Cave: अमरनाथ गुहेपर्यंत रस्तारुंदीकरण पूर्ण, मात्र पीडीपीचा विरोध; जाणून घ्या कारण…

वाहनांचा पहिला ताफा अमरनाथ गुहा मंदिरापर्यंत पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

104
Amarnath Cave: अमरनाथ गुहेपर्यंत रस्तारुंदीकरण पूर्ण, मात्र पीडीपीचा विरोध; जाणून घ्या कारण...
Amarnath Cave: अमरनाथ गुहेपर्यंत रस्तारुंदीकरण पूर्ण, मात्र पीडीपीचा विरोध; जाणून घ्या कारण...

मध्य काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील बालटाल बेस कॅम्पमार्गे दुमेल ते अमरनाथ गुहेपर्यंतच्या (Amarnath Cave) रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (BRO)ने जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ मंदिरापर्यंत रस्तारुंदीकरणाचे काम हाती घेऊन पूर्ण केले. यामुळे आता भाविक आणि प्रवाशांना अमरनाथ मंदिराच्या पवित्र गुहेपर्यंत मोटारीने प्रवास करणे शक्य होणार आहे.

अमरनाथ यात्रा भाविकांसाठी अधिक आरामदायी आणि प्रवेशयोग्य बनवण्याच्या उद्देशाने, मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील बालटाल बेस कॅम्पमार्गे दुमेल ते अमरनाथ गुहेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे वाहनांचा पहिला ताफा अमरनाथ गुहा मंदिरापर्यंत पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबद्दल अधिकाऱ्यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)च्या कर्मचाऱ्यांनी प्रचंड मोठे काम हाती घेऊन अमरनाथ मंदिराच्या गुहेपर्यंत केलेल्या रस्ता रुंदिकरणाच्या कामामुळे त्यांनी इतिहासच रचला आहे, या शब्दात त्यांचे कौतुक केले. Xवर अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचा प्रवास दाखवणारा व्हिडियो बीआरओने शेअर केला आहे.

(हेही वाचा – Delhi Pollution : दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; ‘हे’ तातडीने थांबवले पाहिजे )

मात्र, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (P. D. P.) बीआरओच्या रस्ता रुस्ता रुंदीकरण कामाला विरोध केला असून पीडीपीचे प्रवक्ता मोहित भान यांनी Xवर पोस्ट करून लिहिले आहे की, हे हिंदू धर्माच्या विरोधात हा मोठा गुन्हा आहे. पवित्र स्थाने निसर्गाच्या कुशीत आहेत,मात्र राजकीय फायद्यासाठी धार्मिक स्थळे उद्ध्वस्त होत आहेत. केवळ राजकीय फायद्यासाठी धार्मिक तीर्थयात्रांना सहलीची ठिकाणे बनवणे निषेधार्ह आहे.

भाजपचे पीडीपीला उत्तर…

जम्मू-काश्मीर अमरनाथ गुहा मंदिरबाहेरील रस्तारुंदीकरणाचे काम पहिल्यांदाच पूर्ण झाले आहे. पर्यावरणाच्या परिणामाचे योग्य मूल्यमापन करून मंदिरापर्यंत गुहेपर्यंत काँक्रीटचा रस्ता तयार केला आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एकही झाड कापले गेले नाही, असे म्हणत भाजपने पीडीपीला त्वरित उत्तर दिले. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनी सोमवारी बालटाल मार्गावरून श्री अमरनाथजी गुंफेपर्यंत वाहनांची वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले.

 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.