देशात अनेक ठिकाणी डांबर आणि सिमेंट काँक्रिटचा वापर करुन रस्ते आणि महामार्ग तयार करण्यात येत असतात. यांपासून तयार करण्यात येणारे रस्ते हे खर्चिक असले तरी ते दीर्घकाळ टिकणारे असतात. मात्र कमी खर्चात जास्तीत जास्त टिकणारे रस्ते बनवण्याचा मानस केंद्र सरकारने केला असून, भविष्यात देशात टायर आणि प्लॅस्टिकच्या वस्तूंपासून तयार झालेले रस्ते दिसतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’)
रस्ते निर्मितीसाठी भंगारातील वस्तूंचा वापर
हरियाणातील नूहन येथे वाहनांच्या स्क्रॅपिंग सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. टायर आणि प्लॅस्टिकपासून तयार होणारे रस्ते हे कमी खर्चाचे असतील. केंद्र सरकारच्या नव्या वाहन धोरणांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच वाहने जुनी झाल्यानंतर त्यातून मिळणा-या भंगारातील वस्तूंचा वापर रस्ते निर्मितीसाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
(हेही वाचाः तुमच्या खिशातली नाणी कुठून आली आहेत, हे कसं ओळखाल? ही आहे ‘ट्रिक’)
वाहन निर्मिती क्षेत्राला चालना
स्क्रॅपमध्ये निघालेल्या जुन्या वाहनांचे टायर्स हे रस्ते निर्मितीसाठी वापरण्यात यावेत, यासाठी आपली पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा झाली आहे. यासाठीच देशातल्या प्रत्येक जिल्ह्यांत दोन ते तीन स्क्रॅपिंग सेंटर सुरू करण्याची सरकारी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले. जुनी वाहने स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याने नव्या वाहनांची मागणी वाढेल त्यामुळे देशातील वाहन निर्मिती क्षेत्राला चालना मिळेल.
Join Our WhatsApp Community