रस्त्यांच्या खडी पुरवठ्यावरुन करण्यात आलेले आरोप निरर्थक आहेत. कारण रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कोणत्याही कंत्राटदाराने खडी पुरवठ्या अभावी दोन आठवडे काम थांबल्याचे सांगितले नाही. कोणत्याही कंत्राटदाराने खडीचे दर वाढल्याबाबतचा कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे खडी पुरवठ्यावरुन केलेले आरोप देखील निरर्थकच असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
सुमारे ४०० कि.मी. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रथमच मोठ्या प्रमाणातील निविदा आमंत्रित केल्या. राष्ट्रीय व राज्य स्तरावरील महामार्गांचे काम केल्याचा अनुभव असणाऱ्या संस्था या निविदांना प्रतिसाद देण्यासाठी पात्र होत्या. या नवीन निविदेमध्ये रस्त्यांच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याच्या दृष्टीने अनेक नवीन व कठोर अटींचा समावेश करण्यात आला आहे. रस्त्यांची बांधणी, पावसाळ्याचा कालावधी आणि दोषदायित्व कालावधी दरम्यान कंत्राटदाराने नियुक्त केलेले तांत्रिक मनुष्यबळ गैरहजर असल्यास कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कामे सुरू असताना त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवता यावे, यासाठी उच्च क्षमतेची दृश्यता असणारे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत. सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू असताना त्याविषयीची सविस्तर माहिती नागरिकांना कळावी, यासाठी बॅरिकेडवर क्यूआर कोड देखील प्रकाशित केला जाईल. हा क्यूआर कोड स्कॅन करून जनतेला संबंधित रस्ते कामाचा तपशील सहजपणे कळू शकेल. या नवीन व कठोर अटींचे उल्लंघन केल्यास संबंधित कंत्राटदाराला कठोर दंड बजावण्याची तरतूद देखील निविदेमध्ये समाविष्ट आहे.
रस्त्यांमध्ये उद्भवणारे दोषांसाठी कंत्राटदाराला उत्तरदायी मानून तितक्या भागाची त्याला पुनर्बांधणी स्वखर्चाने करुन द्यावी लागेल. त्याचप्रमाणे, देयक अदा करताना ८०:२० सूत्रानुसार करण्यात येणार आहे. म्हणजेच, २० टक्के रक्कम राखून ठेवली जाईल. गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेकडून काम सर्वार्थाने समाधानकारक असल्याचे प्रमाणित करण्यात आल्यानंतर ही रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्यात येईल. एकूणच, सदर संपूर्ण निविदा प्रक्रिया शासनाच्या प्रचलित धोरणानुसार ई-निविदा पद्धतीने केली आहे, त्यामुळे त्यात गैरव्यवहार असल्याबाबतच्या आरोपात तथ्य नाही.
एवढेच नव्हे तर, रस्त्यांच्या खडी पुरवठ्यावरुन करण्यात आलेले आरोपही निराधार आहेत. कारण रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कोणत्याही कंत्राटदाराने खडी पुरवठ्या अभावी दोन आठवडे काम थांबल्याचे सांगितले नाही. कोणत्याही कंत्राटदाराने खडीचे दर वाढल्याबाबतचा देखील कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. त्यामुळे खडी पुरवठ्यावरुन केलेले आरोपही निरर्थकच असल्याचे रस्ते विभागाने स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community