मुंबई आणि ठाणेकडे जाणारा ‘हा’ मार्ग चार दिवस बंद; हे आहेत पर्यायी मार्ग

139

मुंबईकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणा-यांना चार दिवस अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईकडून ठाण्याकडे जाणारा मार्ग 4 दिवस बंद असणार आहे.

ठाणे शहरातील आनंदनगर सिग्नल ते हायपरसिटी माॅल, वाघबीळ ब्रिज, घोडबंदर रोड या ठिकाणी गरड टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांनी मुंबईहून ठाण्याकडे प्रवास करताना पर्यायी मार्गाने प्रवास करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबरपासून हे काम सुरु असून,16 ऑक्टोबर (उद्या) पर्यंत हे काम सुरु असणार आहे.

( हेही वाचा: तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट; 22 ठार )

पर्यायी मार्ग

  •  घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन इथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  • जड वाहनांनादेखील बंदी घालण्यात आली असून, यामुळे प्रवाशांनी कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजूरफाटा मार्गे ठाण्यात प्रवेश करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
  • मुंब्रा कळव्यावरुन घोडबंदरच्या दिशेने जाणा-या इतर अवजड वाहनांनादेखील खारेगाव टोल नाका इथे प्रवेश बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वाहनांना कशेळी, अंजुरफाटा मार्गे वळवावे. गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रीज खालून खारेगाव टोलानाका, मानकोली, अंजुरफाटा असा पर्यायी मार्ग उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.