आता लवकरच अमेरिकेसारख्या रस्त्यावर पळवा तुमचं वाहन! गडकरींचा मोठा प्लॅन

111

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमी त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या वक्तव्यासाठी ओळखले जातात. नितीन गडकरी यांनी मंत्रीपद स्वीकारल्यापासून देशातील मोठे प्रकल्प पूर्णत्वास नेले आहेत. इतकच नाही, तर त्या प्रकल्पांच्या बांधकामावरुन वर्ल्ड रेकाॅर्डही देशाच्या नावे केले आहेत. आता भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारख्या रस्त्यांची सुविधा देणार असल्याचे त्यांनी संसदेत मंगळवारी सांगितले आहे. म्हणजे आता लवकरच तुम्ही अमेरिकेसारख्या रस्त्यावर आपलं वाहन चालवू शकणार आहात.

अमेरिकेच्या बरोबरीचे रस्ते

नितीन गडकरींनी बोलताना सन 2024 पर्यंतचा प्लॅन ऑफ अॅक्शन सांगितला आहे. भारतातील रस्त्यांचे जाळे आणि पायाभूत सुविधा या 2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने करण्यात येतील. रस्ते सुरक्षासंदर्भात लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्याची गरज असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: पहिलीच्या मुलांना मिळणार नवे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाठ्यपुस्तक! )

गडकरींनी सांगितले महत्त्वाचे मुद्दे 

देशात रस्ते अपघातांमध्ये तब्बल दिड लाखांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात, देशात राष्ट्रीय महामार्गांवर वाढलेले अपघात आणि महामार्गांसाठी रस्त्याचे रुंदीकरण ही केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब असल्याचही, गडकरी यावेळी म्हणाले.

देशातील अपघात कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येत आहेत. देशात रस्त्यांचं मोठं जाळ उभारणं ही मोठी समस्या नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं आहे. रस्ते उभारणी संदर्भातील तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल क्षेत्र, लोकांमधील जनजागृती आणि शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत असंही गडकरी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.