Road महापालिकेच्या निधीतून बनले संजय गांधी उद्यानातील रस्ते

 जी-२०च्या नावाखाली वन विभागाने साधला स्वार्थ

935
Road महापालिकेच्या निधीतून बनले संजय गांधी उद्यानातील रस्ते
Road महापालिकेच्या निधीतून बनले संजय गांधी उद्यानातील रस्ते
  • सचिन धानजी,मुंबई

वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांची (Road ) जबाबदारी ही संबंधित वन विभागाची असूनही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) अंतर्गत रस्त्यांची कामे महापालिकेच्या (BMC) निधीतून करण्यात आली आहे. ताम्हणी पाडा प्रवेशद्वार ते कान्हेरी गुफा पर्यंतचा रस्ता, लॉगहट ते कान्हेरी चौकी पर्यंतचा रस्ता आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार ते कान्हेरी गुफा आणि कान्हेरी गुफा ते लॉग हट पर्यंतच्या रस्त्यांवर (Road ) थर्मो प्लास्टिक पेंटिंग आदींची कामे महापालिकेच्या निधीतून करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आहे असल्याची माहिती समोर आली आहे. (Road )

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील गडकरी आणि फडणवीसांवर मोठी जबाबदारी)

मुंबईत जी २०चे प्रतिनिधी भेटीसाठी आले असता ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) कान्हेरी गुफा येथे भेट देणार होते. हा भेट १६ डिसेंबर २०२२ रोजी ही नियोजित भेट असल्याने वन विभागाचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी होते. या बैठकीत रस्ते (Road) विभागाचे अधिकारी व परिमंडळ ७ उपायुक्त आदींच्या बैठकीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वार येथील रस्त्यांचा आणि रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेतला. परंतु रस्ता दुरुस्ती तथा सुधारणेचे काम मनुष्यबळ व यंत्रसामुग्री अभावी कमी कालावधीमध्ये करणे शक्य नसल्याचे सांगत वन विभागाने हात वर केले आणि याची रस्त्यांची सुधारणा महापालिकेने करावी अशाप्रकारचे पत्रच वनरक्षक श्री.जी. मल्लिकार्जुन (G. Mallikarjuna) यांनी पत्र पाठवून ७ डिसेंबर २०२२ रोजी कळवले. (Road )

या भेटीच्या अनुषंगाने लेफ्टनंट कर्नल उदय सिंह यांनी परिमंडळ ७चे महापालिका उपायुक्त यांच्यासमवेत केलेल्या पाहणीमध्ये संजय गांधी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते कान्हेरी गुफ आणि कान्हेरी गुफा ते लॉग हट पर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महापालिकेच्या रस्ते (Road) विभागाचे अधिकारी यांनी बोरीवली गोराई व्हिलेज अंतर्गत असलेल्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट, सिमेंट काँक्रीटीकरण पॅसेज आणि अस्फाल्टच्या रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या कंपनीकडून या कान्हेरी गुफा परिसरातील रस्त्यांची सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या प्रगती एंटरप्रायझेस कंपनीला गोराईतील कामांसाठी विविध करांसह सुमारे १११ कोटींचे कंत्राट दिले होते, त्यात आणखी ५.१६ कोटींच्या कान्हेरी गुफा परिसरातील रस्त्यांची कामे देण्यात आले. त्यामुळे या कंपनीचे एकूण कंत्राट काम हे ११६ कोटींवर जावून पोहोचले आहे. (Road)

(हेही वाचा- Chandrapur Lok Sabha Constituency : जातीचे गणित मोडू शकतील का मुनगंटीवार?)

त्यामुळे अत्यंत तातडीचे काम म्हणून निविदा न काढता गोराईतील कामांसाठी नेमलेल्या प्रगती एंटरप्रायझेस या कंपनीकडून ताम्हणी पाडा प्रवेशद्वार ते कान्हेरी गुफा पर्यंतचा रस्ता, लॉगहट ते कान्हेरी चौकी पर्यंतचा रस्ता (Road) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे प्रवेशद्वार (Sanjay Gandhi National Park) ते कान्हेरी गुफा आणि कान्हेरी गुफा ते लॉग हट पर्यंतच्या रस्त्यांवर थर्मो प्लास्टिक पेंटिंग आदींची कामे करण्यात आली आहे. मात्र, यासाठी वन विभागाने कोणताही पैसा दिला नसून महापालिकेच्या तिजोरीतून हा पैसा खर्च करण्यात येत आहे. (Road)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.