डॉक्टर दाम्पत्याला बांधून लुटला 67 लाखांचा ऐवज!

डॉ. हिरालाल हे बालरोग तज्ज्ञ असून लोणावळ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. लोणावळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला.

लोणावळ्यातील प्रधानपार्क येथे डाॅक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. डॉक्टर दाम्पत्याला शास्त्राचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि घरातील 50 लाख रुपये रोख सोबत 16 लाख 77 हजार 500 रुपये किमतीचे दागिने असा एकूण 66 लाख 77 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळविला आहे.

अर्धा तास दरोडेखोरांनी डोळ्यादेखत ऐवज लुटला!

७३ वर्षीय डॉ. हिरालाल हे बालरोग तज्ज्ञ असून लोणावळ्यात त्यांचे हॉस्पिटल आहे. लोणावळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा पडला. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लायडिंगची खिडकी खोलून सहा जण धारदार शस्त्रांसह घरात घुसले तर अन्य काही जण घराबाहेर थ‍ांबले होते. डाॅ. खंडेलवाल यांच्या बेडरुमचा दरवाजा उघडा असल्याने दरोडेखोर थेट घरात घुसले. त्यांनी डाॅक्टर व त्यांच्या पत्नी यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावत हात-पाय बांधत घरातील सर्व रोख रक्कम व सोने असा ऐवज त्यांच्या समक्ष लुटला. साधारण अर्धा तासाहून अधिक काळ दरोडेखोर घरात होते. यानंतर गच्चीवरून दरोडेखोर खाली उतरले व लंपास झाले.

(हेही वाचा : सीबीएसई, आयसीएसईचा १२वी निकालासाठी ‘३०:३०:४०’ फॉर्म्युला! )

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, दरोडेखोर गेल्याची खात्री होताच दोरीने बांधलेले हात, पाय डॉक्टरांनी सोडून अलार्म वाजवला. त्यानंतर रात्रपाळीला असलेले कामगार धावत पळत वर आले. त्यांच्यातील एकाने लोणावळा पोलिसांना घटनेची माहिती दिली. पुणे ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here