दिवाळी, नाताळ आदी सण-उत्सवांच्या निमित्ताने अनेक जण गावाला जातात. (Private Bus) कुटुंबियांसमवेत सुट्टी आनंदात साजरी करण्यासाठी प्रवाशांनी २ महिने रेल्वेचे आरक्षण केले आहे. त्यामुळे पुढील २ महिने रेल्वेचे बुकींग फुल झाले. आता रेल्वेचे तिकीट मिळत नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक कंपन्या प्रवाशांची लूट करत आहेत. सणा-वाराच्या दिवसांत खासगी वाहतूक कंपन्यांनी नेहमीच्या तिकीट दरापेक्षा तिप्पट वाढ केली आहे. (Private Bus)
(हेही वाचा – Ind vs Nz : कुलदीप आणि इतर फिरकी गोलंदाजांचं अपयश भारतीय संघाची डोकेदुखी?)
या काळात रेल्वेच्या सामान्य वर्गाच्या डब्यात पाय ठेवायला देखील जागा नसते. अशा स्थितीत कुटुंबियांसोबत एकत्र प्रवास करणे कठीण होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागतो. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने एक अध्यादेश काढून खासगी वाहतूकदार किती दरवाढ करू शकतात, याची मर्यादा घालून दिली आहे. (Private Bus)
अधिकच्या दराविषयी शासननियम
इतर वेळेपेक्षा खासगी प्रवासी वाहन कंपन्या दीडपट भाडेवाढ करू शकतात. त्याहून अधिक दर वाढवल्यास त्या विरोधात प्रवासी आरटीओकडे तक्रार करू शकतात. त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाते.
रेल्वेमध्ये एजंटचा सुळसुळाट
दर तिकिटामागे दोनशे रुपये असे करू पैसे प्रवाशांकडून एजंट वसूल करतात. रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाही. अशा वेळी एजंटला तिकिटांपेक्षा दोनशे रुपये अधिक दिले की, हाती तिकीट मिळते. सण-उत्सव काळात एजंटचे दरही वाढतात. एजंट प्रत्येक तिकिटामागे तीनशे ते चारशे रुपये अधिक घेतात. (Private Bus)
राज्यातील अधिक प्रवास होणाऱ्या शहरांसाठीचे सध्याचे तिकीट दर
नेहमीचे दर… उत्सवातील दर
पुणे-नागपूर
रेल्वे – ४२० ४२०
खासगी वाहने – १००० ३५००
पुणे-गोवा
रेल्वे ३७० ३७०
खासगी १३०० ४०००
पुणे-दिल्ली
रेल्वे ६७५ ६७५
खासगी ३५०० ९९५०
खासगी प्रवासी वाहन कंपन्यांनी तिकीट दर दीडपटहून अधिक वाढविल्यास त्याबाबत आरटीओकडे तक्रार करावी. याविरोधात संबंधितांस दंड आकारला जाईल. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक सेवेचाच वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे. ‘सण-उत्सव काळात रेल्वेचे आरक्षण त्वरित फुल्ल होऊन जाते. यासाठी रेल्वेच्या वतीने जादा गाड्यांची सोय केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा’, असे आवाहन पुणे येथील रेल्वे जनसंपर्क अधिकारी डॉ. रामदास भिसे यांनी केले आहे. (Private Bus)
हेही वाचा –