क्राँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे जावई आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ईडीने वाड्रा यांना देण्यात आलेल्या जामीनासंदर्भात आक्षेप घेतला आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणामध्ये वाड्रा यांना ज्या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला त्या अटींचं पालन केलं जात नसल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडी कोर्टासमोर आपलं म्हणणं एका प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडणार आहे. ईडीने घेतलेल्या याच आक्षेपामुळे वाड्रा यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
(हेही वाचा:Kalyan Crime : कल्याणातील धक्कादायक घटना :आईसमोरच स्वतःच्या मुलीवर तरुणाकडून प्राणघातक हल्ला)
सप्टेंबर मध्ये होणार सुनावणी
ईडीची बाजू कोर्टासमोर मांडताना वकिलांनी रॉबर्ट वाड्रा यांनी जामीन मंजूर करताना घालण्यात आलेल्या अटी पाळल्या नाहीत असा आरोप केला. कोर्टाकडे ईडीने यासंदर्भात दोन आठवड्यांचा वेळ मागितला होता. कोर्टाने यासाठी परवानगी दिली. आता या प्रकरणातील पुढील सुनावणी सप्टेंबर महिन्यात होणार आहे. या सुनावणीमध्येच वाड्रा यांच्या जामीनासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो.
हेही पाहा –