माटुंगा मध्य रेल्वे स्थानकाजवळील Robotic Car Parking चा प्रस्ताव गुंडाळणार?

97
माटुंगा मध्य रेल्वे स्थानकाजवळील Robotic Car Parking चा प्रस्ताव गुंडाळणार?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्यावतीने वाहने उभी करण्यासाठी अत्याधुनिक स्वयंचलित वाहनतळाची (Robotic Car Parking) सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत माटुंगा मध्य रेल्वे स्थानक परिसर, मुंबादेवी मंदिर, फोर्ट येथील हुतात्मा चौक जवळील अप्सरा पेन शॉपजवळील जागेत तसेच वरळी हब येथील जागेत अत्याधुनिक वाहनतळ उभारण्यास मंजूरी देण्यात आली आहे. परंतु, माटुंगामध्ये रेल्वेच्या स्थानकाच्या परिसरातील वाहनतळाला स्थानिकांकडून होणारा विरोध लक्षात घेता महापालिकेने मंजूर कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. या वाहनतळाच्या जागेचा सीटीएस क्रमांक आणि अन्य बाबींवर अधोरेखित करत हा प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करण्याची प्रक्रिकया सुरु झाली असून महापालिका आयुक्त यावर कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(हेही वाचा – परीक्षेचे बनावट वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल; Mumbai University कडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन)

माटुंगा मध्य रेल्वेच्या समोरील १५१८ चौरस मीटरच्या मोकळ्या जागेत १८ मजली अशाप्रकारे ४७५ वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ उभारले जाणार आहे. सध्या पोलिस चौकी असलेल्या जागेसह मोकळ्या जागेवर हे वाहनतळ उभारले जात असून सन २०२२ मध्ये याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये याचे कार्यादेश बजावले होते. यासाठीच्या सर्व प्रकारच्या परवानगी प्राप्त झाल्यानंतर १५ महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. या कार पार्किंगसाठी (Robotic Car Parking) कंत्राटदाराची निवड करून यावर विविध करांसह १२३ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासनाने मान्यता दिली होती. मात्र, यासाठी निवड केलेली जागा चुकीची असून परवानगीमध्ये त्रुटी असल्याची बाब स्थानिक रहिवाशांनी निदर्शनास आणून देत याला तीव्र विरोध करत हे वाहनतळ त्वरीत रद्द केले जावे अशाप्रकारची मागणी लावून धरली.

(हेही वाचा – OM Certificate : हिंदू सणांमध्ये नाशिक झाले ‘ओम’ मय)

त्यामुळे स्थानिकांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून याची पुरक कागदपत्रे प्रशासनाला सादर केल्यानंतर तसेच याचा वाढता विरोध लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने येथील कारपार्किगचा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिकांनी ज्या जागेवर वाहनतळ (Robotic Car Parking) उभारले जाणार आहे. त्यावर सिटीएस क्रमांकच नसल्याची बाब समोर आणली आहे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केल्याने हा प्रस्ताव गुंडाळण्याचे निर्देश वरिष्ठ पातळीवरुन देत याबाबतचा प्रस्ताव बनवून पुढील कार्यवाहीसाठी आयुक्तांकडे पाठवलयाची माहिती मिळत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त यावर काय निर्णय घेता यावर सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.