Roha : रोह्याच्या कुंडलिका नदीला मोठा पूर; रोहा तालुका जलमय! जुन्या पुलावर ३ ते ४ फुट पाणी

रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणी शिरले. रोहा-अष्टमीचा आणि रोहा-कोलाड संपर्क तुटला, वाहतूक खोळंबली, प्रवासी रखडले

192
Roha : रोह्याच्या कुंडलिका नदीला मोठा पूर; रोहा तालुका जलमय! जुन्या पुलावर ३ ते ४ फुट पाणी

रोहा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाने रोह्याच्या कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडत मोठी पूर परिस्थिती निर्माण केली. रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ३ ते ४ फूट पाणी आहे, तर उंच असलेल्या नवीन पुलाला लागून पाणी वाहत आहे. दोन्ही बाजूकडे पुराचे पाणी भरल्याने रोहा अष्टमीकरांसाठी नवीन पूल ही कुचकामी ठरला, पुराच्या पाण्याने संपर्क तुटल्याने वाहतूक बंद पडली, प्रवासीही मोठ्या संख्येने रखडले. रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणी शिरले असून तालुका जलमय झाला आहे. (Roha)

गेली काही दिवस मुसळधार पावसाने सबंध तालुक्याला झोडपून काढले. धुवांधार कोसळणाऱ्या पावसाने कुंडलिका नदीला मोठा पूर आला. मध्यरात्री पासून नदीची पाणी पातळी जलद गतीने वाढू लागली. रोहा शहरातील नगर पालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, एस.टी. स्टँड समोर, फिरोज टॉकीज लगत आदी भागात पाणी मोठ्या प्रमाणात शिरले, बाजारपेठेत काही दुकानांमध्ये पाणी शिरले, तर बायपास रोड, दमखाडी, त्रिमूर्ती नगर, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकुळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटाव मध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. (Roha)

(हेही वाचा – DCM Ajit Pawar : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय)

अष्टमीत आणि कोलाड मार्गावर रस्त्यावर पाणी भरल्याने पलिकडील गावांचा संपर्क तुटला. कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील माती भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आधी नदी लगतच्या परिसरामध्ये पुराचे पाणी शिरल्याचे पुन्हा एकदा समोर आले. वरसे मध्ये सखल भागात पाणी जमायचे मात्र आजच्या पुराने नवरत्न हॉटेल ते वरसे स्टॉप दरम्यान पाणी भरून या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली, रोठ गावा लगत ही काही ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने नदी पात्रात करण्यात आलेल्या माती भरावा बाबत तीव्र शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली गेली. बाजारपेठ, एस टी स्टँड मागे, धनगर आळी आदी ठिकाणी यावेळी पुराचे पाणी शिरले, पावसाने पूरपरिस्थिती अधिक प्रभावी बनल्याने नागरिकांत संभ्रमावस्था आहे. रोहा नगरपालिकेतर्फे रिक्षा फिरवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला. (Roha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.