- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठ्याप्रमाणात रोहिंग्या मुसलमानांची (Rohingya Muslims) संख्या वाढल्याने या विरोधात काही महिन्यांपूर्वी भाजपाचे मुंबई अध्यक्ष व विद्यमान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मोठे आंदोलन करण्यात आले होते. भाजपाचे मुंबई सचिव जितेंद्र राऊत आणि माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी दादरमधील रोंहिग्या मुसलमानांविरोधात हे आंदोलन केल्यानंतर दादरमधील रोहिंग्याचा त्रास कमी झाला का? दादरमधील वाढत्या मुसलमानांच्या संख्येबाबत कारवाई का केली जात नाही? असा सवाल दादरमधील रहिवाशी आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यात सत्ता असतानाही भाजपाच्या आंदोलनाचा परिणाम दादर दिसून येत नसल्याने स्थानिक पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी मुसलमान असल्याचे प्राथमिक माहिती समोर आल्याने मुंबईतील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाशेजारी वाढत्या रोहिंग्या मुसलमान (Rohingya Muslims) विरोधातील भाजपाने केलेल्या आंदोलनाबाबत दादरमधील रहिवाशी आणि स्थानिक फेरीवाले यांच्याकडून सवाल उपस्थित केला जात आहे. भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर या सातत्याने रोहिंग्या मुसलमानांविरोधात मोहिम राबवत असल्या तरी मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.
(हेही वाचा – न्यायालये विचारात घेण्यापूर्वी माध्यमांना याचिका, प्रतिज्ञापत्र प्रसिद्ध करण्यास देणे चुकीचे; Delhi High Court चा आदेश)
राज्यात भाजपाची सत्ता असूनही दादरमधील रोहिंग्या मुसलमान (Rohingya Muslims) विरोधात कोणत्याही प्रकारची मोहिम पोलिसांकडून राबवली जात नाही. निवडणुकीपूर्वी भाजपा आंदोलन करते आणि नंतर मात्र सत्ता असूनही कोणत्याही प्रकारचा परिणाम दिसून येत नसल्याने दादरमधील रहिवाशी आणि स्थानिक फेरीवाल्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दादरमधील छबिलदास गल्ली, आणि सकाळच्या वेळेत सेनापती बापट मार्ग आणि केशवसूत उड्डाणपूलाखाली मोठ्याप्रमाणात मुस्लिम फेरीवाल्यांची संख्या वाढल्याने काही दिवसापूर्वी भाजपाच्या अक्षता तेंडुलकर यांनी सलग दोन दिवस दादर पश्चिम रेल्वे स्थानकांशेजारील प्रत्येक फेरीवाल्यांची झाडाझडती घेतली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दादर रेल्वे स्थानक परिसरात बांगलादेशी मुस्लिम रोहिंग्यांना थारा द्यायचा नाही असाच निर्धार तेंडुलकर यांनी केला होता. परंतु त्यानंतर कोणतातही परिणाम दिसून येत नसून ही संख्या वाढली जात नसल्याने अधिक चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांनी आमच्या पक्षाचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांच्या उपस्थितीत जेव्हा आंदोलन केले होते, तेव्हा किती स्थानिक रहिवाशी त्यात सहभागी झाले होते असा सवाल केला. या आंदोलनात स्थानिक फेरीवाले मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते. परंतु, आमची मोहिम थांबलेली नसून शेवटचा रोहिंग्या (Rohingya Muslims) जात नाही तोवर आमचे हे आंदोलन सुरुच राहणार आहे. यासाठी पोलिस आणि महापालिकेचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी येत्या फेब्रुवारी महिन्यात रोहिग्यांविरोधात मोठी स्वाक्षरी मोहिम राबवली जाणार आहे. यामध्ये स्थानिक रहिवाशी आणि स्थानिक फेरीवाले किती सहभागी होतात हे स्पष्ट होईल, असे तेंडुलकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community