Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप

229
Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप
Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप

बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं छापेमारी केली होती. बारामती अ‍ॅग्रोच्या सहा कार्यालयांवर छापेमारी करत ईडीकडून तपास करण्यात आला होता. यावर रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. (Rohit Pawar ED Raid) त्यानंतर आज रोहित पवारांची ईडी चौकशी होणार आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरू झाले आहेत.

(हेही वाचा – Ind vs Eng 1st Test : ‘विराट’शिवाय खेळणारा भारतीय संघ असा करतोय कसोटीचा सराव)

स्वतंत्र यंत्रणा राहिली नाही

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा ही स्वतंत्र यंत्रणा राहिली नाही. ती भाजपची शाखा झाली आहे. लोकशाहीसाठी हुकुमशाही विरोधात आवाज उठवतील त्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते. मी त्या त्रासातून गेलो आहे, अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण ईडी ग्रस्त आहेत ईडीला घाबरून तिकडे गेले. ईडी तिथे नोटीस पाठवत नाही. पेडणेकर, चव्हाण, वायकर यांना नोटीस पाठवते. ईडी संजय राऊत यांना अटक करते. ईडी भाजपाची शाखा झाली आहे. जे भाजपच्या भ्रष्टाचार बाहेर काढतात त्यांना आत टाकले जाते.

(हेही वाचा – Ayodhya Ram Temple: ९ अग्निकुंड, ६० तास पूजा, ५.५० लाख मंत्र; प्राणप्रतिष्ठा विधीदरम्यान ७ दिवस काय घडले; जाणून घ्या)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लगावला टोला…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आता शांत झोप लागत असेल, कारण ते भाजपसोबत गेले, असा चिमटाही त्यांनी काढला. सध्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ईडीच्या भयाने पक्षातर केलं, असा टोला त्यांनी लगावला. अनेकजण ईडी ग्रस्त आहेत. (Rohit Pawar ED Raid)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.