एक रक्षा (राखी) सैनिकांसाठी’ या शीर्षकांतर्गत डोंबिवलीत राहणारा रोहित आचरेकर हा तरुण भारतीय जवानांसाठी २७ हजाराहून अधिक राख्या आणि ७५० किलो मिठाई घेऊन कारगिल येथे निघाला आहे. १५ ऑगस्ट रोजी या तरुणाने डोंबिवली ते कारगिल Dombivli to Kargil Journey या अडीच हजार किलोमीटरच्या प्रवासाला दुचाकीवरून डोंबिवलीतून सुरूवात केली आहे.
मागील १७ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत. सीमेवर भारतीय जवान चोवीस तास पहारा देत असतात. त्यांच्या प्रती देशातील जनतेला असलेला आदरभाव आपल्या उपक्रमातून व्यक्त व्हावा, या उद्देशातून आचरेकर हा उपक्रम राबवितात. लोकसहभाग, अनेक सामाजिक संस्थांचा सहभाग ते या उपक्रमात घेतात. सीमेवरील सैनिक हा रोहित यांच्या शालेय जीवनापासून आवडीचा विषय. शाळेत असताना ते नियमित सीमेवरील सैनिकांना टपाल पत्र पाठवून त्यांच्या प्रती असलेला आदरभाव व्यक्त करत होते. आपले पत्र त्यांच्यापर्यंत पोहचते की नाही, असा प्रश्न त्यांना नेहमी सतावत होता. त्यामुळे उमेदीत आल्यावर रोहित यांनी स्वताहून सीमेवरील सैनिकांच्या भेटीगाठीचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात त्यांना ससून गावडे, प्रेम देसाई हे दोघेजण ही सोबत आहेत.
(हेही वाचा :Monsoon Update : मान्सुनने फिरवली पाठ, उत्तर महाराष्ट्र पडला कोरडा!, ‘या’ जिल्ह्यांचे शेतकरी संकटात)
रक्षा बंधनाच्या दिवशी सीमेवरील सैनिकांना देशातील जनतेच्या प्रेमातून राख्या बांधता याव्यात म्हणून रोहित यांनी देशाच्या विविध भागातून २८ हजाराहून अधिक राख्या जमा केल्या आहेत. डोंबिवलीतील रोट्रॅक्ट क्लबने राखी संकलनासाठी मोलाची मदत केली. या राख्या आणि ७५० किलो मिठाई घेऊन ते १० दिवसात कारगिल येथे पोहचणार आहेत. कारगिलसह परिसरात तैनात असलेल्या जवानांसोबत रोहित आणि त्यांचे सहकारी रक्षा बंधनाचा कार्यक्रम करणार आहेत. ५० किलो मिठाई कारगिल आणि उर्वरित मिठाई इतर लष्करी तळांवरील जवानांना वाटप केली जाणार आहे, असे ही रोहित यांनी सांगितले.
असा असेल मार्ग
डोंबिवली, सुरत, अहमदाबाद, जयपूर, उदयपूर, पाली, चंडीगड, हरियाणा, पंजाब, यमुनानगर, दिल्लीमार्गे कारगिल असा प्रवास दुचाकीवरुन केला जाणार आहे.
हेही पहा –