पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkata) येथील एका प्रसिद्ध लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सरस्वती पूजा करण्यास नकार देण्यात आला. विद्यार्थी आणि विद्यार्थीनीचा आरोप आहे की, सत्ताधारी टीएमसीचा (TMC) एक नेता त्यांना धमकी देत होता. तसेच बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देत होता, असा विद्यार्थ्यांनी आरोप केला.
( हेही वाचा : पैलवान Shivraj Rakshe कुस्तीगीर परिषदेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार)
वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसची छात्र परिषदेचे महासचिव शब्बीर अलीने (Shabbir Ali) जोगेश चंद्र चौधरी (Jogesh Chandra Chaudhary) लॉ कॉलेजमधी विद्यार्थी आणि विद्यार्थींनीनी सरस्वती पुजेचे आयोजन करण्यापासून थांबवले. पूजेचे आयोजन केल्यावर विद्यार्थ्यांना बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
दरम्यान पीडित विद्यार्थ्यांनी चारुमार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य पंकज रॉय यांच्याकडेही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते मोहम्मद शब्बीर अली यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे, पश्चिम बंगालच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनीही याच महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे.
एका विद्यार्थ्याने सांगितले, “हे बाहेरचे लोक पैसे उकळण्यासाठी येतात. त्यांना वाटते की विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजा आयोजित करू नये. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि मारहाण केली, त्यांनी आमच्यावर बलात्कार करण्याची धमकीही दिली. दुसऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले, “आम्हाला पूजा आयोजित करण्याचा अधिकार आहे. आम्हाला का थांबवले जात आहे? आम्हाला सांगण्यात आले आहे की जर आम्ही सरस्वती पूजा आयोजित केली तर तो अन्वर शाह रोडवरून जाताना आम्हाला मारून टाकू. ते इथे पैसे गोळा करत आहेत.”
टीएमसी नेते मोहम्मद शब्बीर अली यांच्यावर विद्यार्थिनींना मुलींच्या वसतीगृहात पाठवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. असा आरोप आहे की, शब्बीरने विद्यार्थिनींना त्यांच्या वसतिगृहात सरस्वती पूजा आयोजित करण्यापासूनही रोखले. या महाविद्यालयात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी आहे. शब्बीर अली आणि इतर टीएमसी गुंड येथे घुसून गोंधळ घालत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. भीतीचे वातावरण इतके आहे की, प्राचार्यांना स्वतः सरकारी महाविद्यालयांमध्ये जाण्याची भीती वाटते. प्राचार्य पंकज रॉय म्हणाले, “गेल्या वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेताना मला त्रास झाला. माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत मी हे कधीही पाहिले नाही.”
त्यांनी टीएमसीच्या गुंडांकडून चालवल्या जाणाऱ्या खंडणी रॅकेटकडेही लक्ष वेधले. “एकतर त्यांना पैसे द्या नाहीतर अडचणीला सामोरे जा,” असे रॉय म्हणाले. प्राचार्य रॉय म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी यापूर्वी कॉलेज प्रशासनाने परवानगी दिली नसल्याच्या अफवा पसरवल्या होत्या. त्यांनी सांगितले की, या घटनेबाबत त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community