Royal Enfield Classic 350 Bobber : रॉयल एनफिल्डची पारंपरिक बॉबर भारतात परतणार

Royal Enfield Classic 350 Bobber : रॉयल एनफिल्ड कंपनीने यंदा ३५० सीसी क्षमतेच्या बाईकवर लक्ष केंद्रीत केलं आहे

6166
Royal Enfield Classic 350 Bobber : रॉयल एनफिल्डची पारंपरिक बॉबर भारतात परतणार
Royal Enfield Classic 350 Bobber : रॉयल एनफिल्डची पारंपरिक बॉबर भारतात परतणार
  • ऋजुता लुकतुके

२०२४ हे वर्ष दुचाकींच्या इतिहासात रॉयल एनफिल्ड या प्रिमिअर श्रेणीतील बाईकचं आहे. कारण, वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने शॉटगन ६५० बाईक लाँच (Royal Enfield Classic 350 Bobber) केली. आता कंपनीची तयारी सुरू आहे ती ३५० सीसी क्षमतेच्या बाईकच्या विस्ताराची. यासाठी ते ३५० सीसी क्लासिक बाईकचं नुतनीकरण करत आहेत. याच श्रेणीत कंपनीची नवीन ३५० सीसी बॉबर ही बाईक जून महिन्यात भारतात लाँच होण्याच्या तयारीत आहे. भारतातच चेन्नई इथं या बाईकचं उत्पादनही सुरू झालंय. (Royal Enfield Classic 350 Bobber)

(हेही वाचा- Ram Mandir Ayoddhya : रामनवमीनिमित्त अयोध्येत उत्साह; रामलल्लाचे दर्शन २० तास चालू रहाणार)

कंपनची ही रेट्रो स्टाईल बाईक क्लासिक श्रेणीत आधीपासूनच लोकप्रिय आहे. आता कंपनीला ती थोडी अत्याधुनिक बनवायची आहे. त्यामुळे क्लासिकपेक्षा ती थोडी ट्रेंडी आणि किमतीने जास्त महाग असेल हे स्पष्टच आहे. मिटिओर ३५० शी ती मिळतीजुळती असेल. (Royal Enfield Classic 350 Bobber)

पारंपरिक आरई ३५० क्लासिक बाईकचं जुनं रेट्रो चित्र अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यामुळे तो लुक कंपनीने कायम ठेवलाय. २०१७ मध्ये क्लासिक लाँच झाली तेव्हाचा एक फोटो बघूया, (Royal Enfield Classic 350 Bobber)

(हेही वाचा- Sangli Lok Sabha : राज्यातील काँग्रेसचा बंडखोर उमेदवाराला पाठिंबा?)

हा लुक ही मॉडेलची ओळख आहे. आणि ती कंपनीला बदलायची नाही. फक्त नवीन बाईक ही दोन प्रवाशी बसतील अशी असेल. पण, गरज नसेल तर दुसरी सीट काढूनही टाकता येईल. या गाडीत जुनंच ३४९ सीसी क्षमतेचं जे सीरिजचं इंजिन असेल. सिंगल सिलिंडर मोटार असलेलं हे इंजिन २०.२ बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. गाडीत ५ स्पीड गिअर-बॉक्स असेल. आणि क्रॅश गार्डही बसवण्यात आलं आहे. (Royal Enfield Classic 350 Bobber)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी; शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्याशी सामना)

रॉयल एनफिल्डच्या क्लासिक बॉबरला बाजारात थेट स्पर्धा नाही. त्यामुळे ही बाईक दणक्यात एंट्री घेईल. आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल हे नक्की आहे. दोन लाख रुपयांपासून ही बाईक भारतात उपलब्ध होईल. (Royal Enfield Classic 350 Bobber)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.