देशातील दुर्गम आणि सतत पडणाऱ्या दरोड्याच्या भागात रेल्वेतर्फे ‘स्टार्ट जवान’ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाचे अत्याधुनिक शस्त्रास्त्राने सज्ज असलेले जवान दौंड ते सोलापूर मार्गावर धावणाऱ्या २८ रेल्वेमध्ये तैनात करण्यात आले आहेत. दौंड ते कुर्डुवाडीपर्यंत ४० आणि कुर्डुवाडी ते सोलापूरदरम्यान २० जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
( हेही वाचा : महाराष्ट्रात ओला -उबर होणार बंद? उच्च न्यायालय म्हणाले… )
दरोडा मुक्त करण्यासाठी जवानांची मदत
या उपक्रमात रेल्वे प्रवासी महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. रेल्वेत घडणाऱ्या चोरीच्या घटना व गैरप्रकारांना आळा घालण्याचा प्रयत्न आहे. याबाबत आयुक्त डॉ. चिंचवाडे यांनी प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार देशात अनेक कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी असणाऱ्या या बलशाली आणि शस्त्रधारी जवानांची नेमणूक करण्यात आली आहे. जिंती, पारेवाडी हा भाग संपूर्णपणे दरोडा मुक्त करण्यासाठी या जवानांची मदत होणार आहे.
( हेही वाचा : विदर्भात उष्णतेची लाट, तर राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता! )
रात्रीच्या वेळी प्रवास करताना महिलांना कोणताही व्यक्ती त्रास देत असेल किंवा पाठलाग करत असेल, तर महिला या शस्त्रधारी पोलिसांकडे ताबडतोब तक्रार करू शकणार आहेत.
Join Our WhatsApp Community