RRB Exam : रेल्वे भर्ती बोर्ड परीक्षेसाठी मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष ट्रेन सेवा

44
RRB Exam : रेल्वे भर्ती बोर्ड परीक्षेसाठी मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष ट्रेन सेवा

मध्य रेल्वे रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी) द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या फायद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि नागपूर दरम्यान १० विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे. (RRB Exam)

तपशील खालीलप्रमाणे :

01103 आरआरबी विशेष दि. २३.११.२०२४ ते दि. २७.११.२०२४ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १५.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.५० वाजता पोहोचेल. (५ सेवा)

(हेही वाचा – Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीत पहिल्या दिवशी २१७ धावांवर १७ बळी, अनेक विक्रमांची मोडतोड)

01104 आरआरबी विशेष दि. २४.११.२०२४ ते दि. २८.११.२०२४ पर्यंत नागपूर येथून दररोज १३.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. (५ सेवा)

थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा. (RRB Exam)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : वरळीत कोण ठरणार डार्क हॉर्स?)

संरचना : दोन वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, २ ब्रेक व्हॅनसह ८ द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था.

आरक्षण : 01103/01104 साठी बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू आहे. (RRB Exam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.