‘आरआरआर’चे यश आणि जळणार्‍यांची जळजळ

आरआरआर या चित्रपटाच्या नाटू नाटू या गाण्याने इतिहास रचला आहे. मूल तेलगू गाण्याला ’ओरिजिनल सॉंग; यासाठी ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. एम. एम. किरावानी यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले असून काल भैरव आणि राहुल सिप्लिगुंज यांनी गायन केले आहे व चंद्रबोस यांनी हे सुंदर गाणं लिहिलं आहे. राजमौली हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांनी नाकं मुरडली होती.

कोणता चित्रपट कोणाला आवडला पाहिजे, हे ज्याच्या त्याच्या अभिरुचीवर अवलंबून असतं. मात्र एखाद्या चित्रपटात हिंदू संस्कृतीचं प्रदर्शन केलं असल्यामुळे जर कोणाला हा चित्रपट आवडत नसेल तर मात्र कलेच्या दृष्टीकोनातून समस्या निर्माण होऊ शकते. एरव्ही कलेला जात व धर्म नसतो. मग बाहुबली, आरआरआर असा चित्रपटांत धर्म शोधण्याचा प्रयत्न झाला. नसरुद्दीन शाह यांच्या पत्नीचं विधान चिंता निर्माण करणारं आहे आणि कलेच्या क्षेत्रात गेली ७० हून अधिक वर्षे हिंदू विरोधी लोकांचं राज्य होतं हे जाणून अंगावर काटा उभा राहतो.

(हेही वाचा अमृता फडणवीसांना लाचेची ऑफर देणाऱ्या आरोपी अनिक्षाच्या वडिलाचा ठाकरेंसोबत फोटो)

या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतरही अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. कांतारा चित्रपटावर देखील अशा प्रकारची टिका झाली. या पार्श्वभूमीवर कांतारा चित्रपटाचे दिग्दर्शक यांनी व्यक्त केलेले मत अतिशय महत्वाचे ठरते. शेट्टी म्हणाले की, भारतीय लोकांना भारतीय संस्कृतीचे चित्रपट बघायला आवडतात दि एलिफेंट व्हिस्पर्स या लघुपटाला देखील ऑस्कर पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावरुन रिशभ शेट्टी यांनी म्हणणे किती अर्थपूर्ण आहे याचा प्रत्यय आपल्याला येतो.

राजमौली यांनी बर्‍याचदा आपल्या भारतीय संस्कृतीचं सकारात्मक प्रदर्शन केलं आहे. भारतीय परंपरा, मान्यता यांचा भारतीय जनमानसावर मोठा परिणाम झाला आहे. काही मूठभर शहरी लोक याचा विरोध करत असले तरी बहुसंख्य भारतीय जनता श्रद्धाळू आहे आणि त्यांच्या श्रद्धेमुळे इतरांचा जीव जात नाही हे विशेष. या दोन्ही चित्रपटाला मिळालेल्या ऑस्करची ही सुखद घटना आपल्या असा संदेश देते की तुम्हाला सर्वोच्च स्थानावर पोहोचण्यासाठी आणि जागतिक दर्जाचे पुरस्कार मिळवण्यासाठी भारताची आणि हिंदू संस्कृतीची बदनामी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे कुणी कितीही टिका केली तरी काहीही फरक पडत नाही. उलट हिंदु भावविश्वाची ही सकारात्मक लाट आता कुणीही रोखू शकणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here