- ऋजुता लुकतुके
एका शाळेत पहिल्या इयत्तेसाठी मुलांकडून ४ लाख रुपयांचं वार्षिक शुल्क आकारल्याची एक घटना सोशल मीडियामुळे समोर आली आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे. एका मोठ्या शहरातील नावाजलेल्या शाळेनं आकारलेलं हे शुल्क आहे. आणि पहिलीतील पाल्याचे एक पालक रिषभ जैन यांनी शाळेकडून मिळालेली पावतीच सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. नोंदणी शुल्क, प्रवेश शुल्क, वार्षिक शैक्षणिक शुल्क, प्रवास खर्च आणि वह्या पुस्तकांचा खर्च मिळून एकूण ४ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम शाळेनं घेतली आहे. (Rs 4 Lakhs Tuition Fee)
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहली टाकणार राहुल द्रविडला मागे?)
Good education is a luxury – which middle class can not afford
My daughter will start Grade 1 next year, and this is the fee structure of one of the schools we are considering in our city. Note that other good schools also have similar fees.
– Registration Charges: ₹2,000
-… pic.twitter.com/TvLql7mhOZ— RJ – Rishabh Jain (@rishsamjain) November 17, 2024
जैन यांच्या या पोस्टला अर्थातच अनेक पालकांनी सहमती दर्शवली आहे आणि त्यांच्या शाळांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. शिक्षणाचा दर्जा आणि शुल्क यांचा ताळमेळ साधताना पालकांची फरफट होत असल्याची तक्रार अनेक पालकांनी केली आहे. एका पालकांनी तर प्रतिक्रिया देताना आपल्या पाल्यासाठी १२ वर्षांत १.२ कोटी रुपये खर्च केल्याचं म्हटलं आहे. रिषभ जैन यांनी शाळेला नेमके किती पैसे भरले ते पाहूया. (Rs 4 Lakhs Tuition Fee)
(हेही वाचा – केजरीवालांना दिल्लीच्या विकासापेक्षा भांडण्यातच जास्त रस; Kailash Gahlot यांची टीका)
या पोस्टमुळे परवडण्याजोगं शिक्षण हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. शाळांचं शैक्षणिक शुल्क ठरवताना सरकारची भूमिका नेमकी काय असते हा प्रश्नही आता विचारला जात आहे. (Rs 4 Lakhs Tuition Fee)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community