Rs 60 Lakh Job : लिंक्डइनवरून ६० लाख रुपयांची पगाराची ऑफर मिळवणारी मुसकान अगरवाल कोण आहे?

लिंक्डइन या प्रोफेशनल लोकांना एकत्र आणणाऱ्या सोशल मीडियामुळे एका मुलीला नोकरी मिळवण्यात मदत झालीय आणि नुकत्याच बीटेक झालेल्या या मुलीला चक्क ६० लाख रुपयांचं पॅकेज मिळालं. अशी ही मुसकान अगरवाल कोण आहे पाहूया…

154
Rs 60 Lakh Job : लिंक्डइनवरून ६० लाख रुपयांची पगाराची ऑफर मिळवणारी मुसकान अगरवाल कोण आहे?
Rs 60 Lakh Job : लिंक्डइनवरून ६० लाख रुपयांची पगाराची ऑफर मिळवणारी मुसकान अगरवाल कोण आहे?
  • ऋजुता लुकतुके

लिंक्डइन या प्रोफेशनल लोकांना एकत्र आणणाऱ्या सोशल मीडियामुळे एका मुलीला नोकरी मिळवण्यात मदत झालीय आणि नुकत्याच बीटेक झालेल्या या मुलीला चक्क ६० लाख रुपयांचं पॅकेज मिळालं. अशी ही मुसकान अगरवाल कोण आहे पाहूया… (Rs 60 Lakh Job)

भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मुसकान अगरवालची जोरदार चर्चा आहे. उत्तरप्रदेशची मुसकान बीटेक आहे. आणि तिच्या बरोबरच्या मुलांमध्ये तिला सर्वाधिक म्हणजे ६० लाखांचं पॅकेज मिळालं आहे. पेशाने कोडर असलेली मुसकान इथपर्यंत कशी पोहोचली ते पाहूया… (Rs 60 Lakh Job)

मुसकान ही उना येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीमधून बीटेक केलेली मुलगी आहे. गलेलठ्ठ पगारासाठी नामांकीत कॉलेजमधून डिगरी लागते हा समज तिने खोटा ठरवलाय आणि कॉलेज शिक्षणाबरोबरच कौशल्यविकास आणि नेटवर्किंगला महत्त्व देत तिने ही मजल मारलीय. त्यामुळे तिची जोरदार चर्चा होतेय. (Rs 60 Lakh Job)

सध्या ती बंगळुरू इथं एका आयटी कंपनीत नोकरी करते. पण, आपला अभ्यासक्रम पूर्ण करताना तिने अनेक ठिकाणी इंटर्नशिप अभ्यासक्रम पूर्ण केलेत आणि त्याचबरोबर कोडिंग शिकल्यावर त्याच्या देश पातळीवरील स्पर्धांमध्येही तिने भाग घेतलाय. अशाच एका टेकगिक गीक गॉडेस २०२२ या स्पर्धेत ती देशातील अव्वल महिला कोडर ठरली. या स्पर्धेत तिला दीड लाखांचं बक्षीसही मिळालं. (Rs 60 Lakh Job)

(हेही वाचा – Air pollution: वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे सक्रिय; आढावा बैठक घेवून दिले निर्देश)

या स्पर्धेविषयीची सविस्तर माहिती आणि त्यात तिने केलेली कामगिरी तिने नीट आपल्या लिंक्डइन प्रोफाईलवर लिहिली होती. गर्लस्क्रिप्ट फाऊंडेशनच्या कोडिंग कार्यक्रमातही तिचा सहभाग होता आणि लिंक्डइनच्या मेंटॉरशिप कार्यक्रमात ४० महिलांमध्ये तिचा समावेश होता. (Rs 60 Lakh Job)

या सगळ्याचा फायदा तिला नोकरी शोधताना होत गेला आणि अखेर बीटेक होऊन पाचच महिने झालेले असताना तिने देशातील आघाडीच्या शिक्षण संस्थांमधील कॅम्पस मुलाखतींना मागे टाकून ६० लाखांचं पॅकेज मिळवलं आहे. ती नेमक्या कुठल्या कंपनीत काम करणारए हे गुप्ततेसाठी उघड केलेलं नाही. (Rs 60 Lakh Job)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.