- ऋजुता लुकतुके
किरण जेम्स कंपनीचे प्रमोटर मावजीभाई श्यामजीभाई पटेल यांनी मुंबईच्या वरळी भागात ९७.७ कोटी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. ओबेरॉय ३६० वेस्ट या गृहप्रकल्पातील हे घर ४७ व्या मजल्यावर असून १४,८११ वर्ग फुटांचं आहे. ८८४ फूटांची अतिरिक्त जागाही या घराबरोबर मिळणार असून पुढे घराचा विस्तार शक्य असेल. (Rs 97 Crore House)
झॅपकी या रिअल इस्टेट क्षेत्रातील संस्थेनं घराच्या नोंदणीची कागदपत्र पाहिली आहेत आणि त्यानुसार हा करार मावजीभाई पटेल आणि ओॲसिस रियाल्टीचे भागीदार स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी दरम्यान झाला आहे. घराबरोबरच ९ गाड्यांसाठीचं पार्किंगही पटेल यांनी विकत घेतलं आहे. आणि नोंदणीसाठी ५.८ कोटी रुपयांची स्टँप ड्युटी भरली आहे. (Rs 97 Crore House)
(हेही वाचा – IPL 2024, LSG bt MI : लखनौकडून झालेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स तळाला)
प्रकल्पाला ३६० वेस्ट असं नाव
ओबेरॉय ३६० वेस्ट या प्रकल्पात ४ आणि ५ बेडरुमची घरं असून प्रकल्पात दोन टॉवर आहेत. यातील एका टॉवरमध्ये रिट्झ-कार्लटन हे लक्झरी हॉटेल आहे. तर दुसऱ्या टॉवरमध्ये प्रशस्त घरं आहेत. टॉवरची उंची ३६० मीटर असल्यामुळे आणि सर्व घरं पश्चिमेला समुद्राकडे तोंड करून असल्यामुळे प्रकल्पाला ३६० वेस्ट असं नाव देण्यात आलं आहे. भारतात लक्झरी श्रेणीतील घरांची मागणी गेल्या काही वर्षांत वाढली आहे. दीड कोटी रुपयांच्या वरील घरं ही या श्रेणीत येतात. आणि ॲनारॉक्स संस्थेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये एकूण १,१६,२२० इतकी घरं नव्याने बांधण्यात आली. आणि यातील ३१,१८० किंवा २७ टक्के घरं ही लक्झरी श्रेणीतील होती. (Rs 97 Crore House)
गेल्याच महिन्यात राकेश झुनझुनवाला यांच्या पत्ती रेखा झुनझुनवाला यांनी वाळकेश्वर भागात ११.७ कोटी रुपयांना एक घर विकत घेतलं. १,१६६ वर्ग फुटांचं हे घर रिसेलचं आहे. तर २०२४ मध्ये आतापर्यंत झालेल्या व्यवहारांमध्ये अनिल गुप्ता यांनी केलेला २७० कोटी रुपयांचा सौदा हा सगळ्यात मोठा सौदा आहे. वेलनोन पॉलिएस्टर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या गुप्ता यांनी लोढा मलबार प्रकल्पात दोन घरं २७० कोटी रुपयांत विकत घेतली आहेत. (Rs 97 Crore House)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community