RSS: केरळमध्ये RSSची तीन दिवसीय समन्वय बैठक सुरू

बैठकीत राष्ट्रहिताच्या विविध मुद्द्यावर होणार चर्चा

65
RSS: केरळमध्ये RSSची तीन दिवसीय समन्वय बैठक सुरू
RSS: केरळमध्ये RSSची तीन दिवसीय समन्वय बैठक सुरू

केरळमधील पलक्कड (Kerala Palakkad) जिल्ह्यात 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) तीन दिवसीय समन्वय बैठक सुरू झाली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Sarsangchalak Mohan Bhagwat), सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे, भाजप प्रमुख जेपी नड्डा (BJP chief JP Nadda) आणि अन्य नेते पोहोचले. या बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमधील भूस्खलनाची घटना आणि त्यात मदत करण्यासाठी संघ कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

(हेही वाचा – Avani Lekhara : पॅरालिम्पिकमध्ये ३ पदकं मिळवणारी पहिली नेमबाज अवनी लेखरा )

आरएसएसची (RSS) ही बैठक 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. RSS प्रेरित सुमारे 32 संघटनांचे प्रतिनिधीही यात सहभागी होणार असून, यामध्ये सुमारे 320 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. संघाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही आरएसएसची कार्यकारिणी बैठक नसून त्याच्याशी संबंधित विविध संघटनांची बैठक आहे. या बैठकीत आरएसएस प्रेरित संघटनांचे कार्यकर्ते त्यांच्या कामाची माहिती आणि अनुभवांची देवाणघेवाण करतील.

या बैठकीत राष्ट्रहिताचे विविध मुद्दे, अलीकडच्या महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या विविध पैलूंवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका प्रश्नाच्या उत्तरात आंबेडकर म्हणाले की, बांगलादेशात घडणाऱ्या घटनांवरही बैठकीत चर्चा होणार आहे.

(हेही वाचा – झोपडपट्ट्यांच्या बाजूला असणाऱ्या महाविद्यालयांतील महिला विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी काय केले? Bombay High Court कडून राज्य सरकारकडे विचारणा )

2025 मध्ये विजयादशमीला जेव्हा आरएसएस आपले शताब्दी वर्ष साजरे करेल, तेव्हा संघटना पाच नवीन उपक्रम सुरू करेल, असेही ते म्हणाले. यामध्ये सामाजिक समरसता, कौटुंबिक जागरूकता, पर्यावरण संरक्षण, स्वावलंबन आणि नागरी जबाबदारी यांचा समावेश होतो.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.