आता आरटीपीसीआर चाचणी अवघ्या ३५० रुपयांत

राज्यात खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना तपासणीचे दर पुन्हा कमी करण्यात आले आहेत. कोरोना तपासणासाठी केल्या जाणा-या आरटीपीसीआर चाचणीसाठी आता ३५० रुपये आकारले जाणार आहेत, आरोग्य विभागानं याबाबतचा सरकारी अध्यादेश सोमवारी प्रसिद्ध केला आहे.

घरातून चाचणी ७०० रुपये

कोरोना चाचणी दरासाठी कमीतकमी ३५० रुपये, तर जास्तीतजास्त ७०० रुपये आकारले जातील. संकलन केंद्रावरुन नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देण्याच्या प्रक्रियेसाठी केवळ ३५० रुपये आकारण्याची मर्यादा खासगी प्रयोगशाळांवर घालण्यात आलीय. रुग्णालय, कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटरमधील प्रयोगशाळांमधील स्वॅब नमुने घेऊन तपासणी तसेच अहवाल आदींचा दर ५०० रुपयांपर्यंतच आकारला जाईल. मात्र रुग्णाच्या घरातून स्वॅब नमुने घेणं आणि अहवाल देण्यासाठी सातशे रुपयांच्यापेक्षा जास्त पैसे खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत.

(हेही वाचा मुंबईतही ओमायक्रॉनचा शिरकाव: दोन रुग्णांना लागण)

विविध चाचण्यांचे असे असतील दर

आरटीपीसीआर चाचणीसोबतच रॅपीड अँटीजेन, अँटीबॉडीज या चाचण्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. हे दर अनुक्रमे रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत आल्यास, तपासणी केंद्रावरुन अथवा एकत्रित नमूने घेतल्यास आणि रुग्णाच्या घरी जावून नमूने घेतल्यास अशा तीन टप्प्यांसाठी आकारण्यात येणार आहेत. अँटीबॉडीज (एलिसा फॉर सार्स कोविड) या चाचण्यांसाठी २००, २५० आणि ३५० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. सीएलआयए फॉर सार्स कोविड अँटीबॉडीज या चाचणीसाठी ३००, ४००, ५०० असे दर निश्चित करण्यात आले आहेत. रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here