“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ” (आर.टी.ई.) (RTE Admission) अंतर्गत सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतिक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकांचे ३० मे २०२३ पासून प्रवेश सुरू झाले आहेत. प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून प्रवेश पत्राची (अलॉटमेंट लेटर) प्रिंट काढावी. हे प्रवेश पत्र व आवश्यक कागदपत्रे घेवून नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून १२ जून २०२३ पर्यंत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे आवाहन महापालिका शिक्षण खात्याने केले आहे.
आर.टी.ई अंतर्गत (RTE Admission) वंचित व दुर्बल घटकांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरू आहे. सन २०२३ – २४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन सोडत (लॉटरी) ५ एप्रिल २०२३ रोजी काढण्यात आली होती. मुंबईत ऑनलाईन लॉटरीनुसार निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ६९० तर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी संख्या ४ हजार ३९८ इतकी आहे. निवड यादीतील ३ हजार ३७२ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ५८ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. २ हजार २६० पालकांनी पडताळणी समितीशी / शाळेशी संपर्क साधलेला नाही.
(हेही वाचा – BMC : महापालिकेच्या जल अभियंता पदी चंद्रकांत मेतकर तर पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या प्रमुख अभियंता पदी राजू जहागीरदार)
शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या ३० मे २०२३ रोजीच्या निर्देशानुसार, प्रतिक्षा यादी टप्पा क्रमांक १ मधील प्रवेश प्रक्रिया (RTE Admission) सुरु झाली आहे. २९ मे २०२३ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसार लघुसंदेश (एस. एम. एस.) पाठविण्यात आले आहेत. पालकांनी केवळ एस.एम.एस. वर अवलंबून न राहता आर.टी.ई संकेतस्थळाववरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे अवलोकन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हेही पहा –
प्रतिक्षा यादीतील बालकाच्या (RTE Admission) पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून प्रवेश पत्राची (अलॉटमेंट लेटर) प्रिंट काढावी. सदर प्रवेशपत्र व आवश्यक कागदपत्रे घेऊन नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक १२ जून २०२३ पर्यंत कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (खासगी प्राथमिक शाळा) राजू तडवी यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community