RTE Admission : ‘आरटीई’ तील शाळा नोंदणीला शनिवारपर्यंत मुदतवाढ

85
RTE Admission : 'आरटीई' तील शाळा नोंदणीला शनिवारपर्यंत मुदतवाढ

आरटीई (RTE Admission) प्रवेश प्रक्रियेत शाळा नोंदणीच्या पहिल्या टप्प्याला शासनाकडून ४ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांना ४ जानेवारीपर्यंत आरटीई प्रक्रियेत नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत १४८ शाळांची नोंदणी झाली असुन उर्वरित ९१ शाळांना नोंदणीकरीता चार दिवसांची डेडलाइन देण्यात आली आहे. आरटीईच्या सन २०२५-२६ शैक्षणिक सत्राकरिता डिसेंबरपासूनच प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar यांच्या नावाने दिल्लीत कॉलेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार भूमिपूजन)

पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी प्रक्रिया राबविली जात असून १८ ते ३१ डिसेंबरपर्यंत शाळा नोंदणीचा कार्यक्रम शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला होता. ३१ डिसेंबरपर्यंत शेवटच्या दिवशी केवळ १४८ शाळांनी नोंदणी केली होती. अद्यापही सुमारे ८४ शाळांची नोंदणी शिल्लक असल्याने जिल्हास्तरावर या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. अखेर मंगळवारी रात्री उशीरा शाळा नोंदणीच्या मुदतवाढीचे आदेश धडकले. शाळा नोंदणीला १ ते ते ४ जानेवारीपर्यंत चार दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. (RTE Admission)

(हेही वाचा – Chinmoy Krishna Das यांना दिलासा नाहीच; जामीन अर्ज फेटाळला)

सद्यस्थितीत १४८ शाळांची नोंदणी झाली असून अद्यापही ९१ शाळांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे या ९१ शाळांपैकी किती शाळा आरटीईमध्ये (RTE Admission) नोंदणी करतात. याकडे लक्ष लागले आहे. मागीलवर्षी २३० शाळांची नोंदणी झाली होती. या चार दिवसांत शाळा नोंदणी न झाल्यास पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची देखील शक्यता आहे. कारण शाळा नोंदणी पुर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी प्रवेशाचा पुढील कार्यक्रम जाहीर होणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.