5th And 8th Annual Exams:’आरटीई’ नियमात १४ वर्षांनी पुन्हा बदल, ५वी आणि ८वीची परीक्षा २ एप्रिलपासून

‘आरटीई’ धोरणानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती.

10177
5th And 8th Annual Exams:'आरटीई' नियमात १४ वर्षांनी पुन्हा बदल, ५वी आणि ८वीची परीक्षा २ एप्रिलपासून
5th And 8th Annual Exams:'आरटीई' नियमात १४ वर्षांनी पुन्हा बदल, ५वी आणि ८वीची परीक्षा २ एप्रिलपासून

१४ वर्षांनी आरटीई नियमात (Right of Children to Free and Compulsory Education Act, 2009) पुन्हा बदल करण्यात आला आहे. इयत्ता ५वी ते ८वीच्या (5th And 8th Annual Exams) वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठवण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे. या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा २ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे यंदा वार्षिक परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण व्हावी लागणार आहे, त्याशिवाय विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाताच येणार नाही. त्यामुळे आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पुढच्या वर्गात पाठविण्याचा प्रकार कायमचा बंद होणार आहे.

(हेही वाचा – New Womens Policy: राज्याच्या नव्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात, कसा होणार फायदा; वाचा सविस्तर)

बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ
‘आरटीई’ धोरणानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याची पद्धत २०१० पासून सुरू झाली होती. त्यावेळी या ढकलपास पद्धतीला अनेकांनी विरोध केला, तरीपण ही पद्धत राज्यभर लागू झाली. सरसकट पास करण्याच्या पद्धतीमुळे इयत्ता दहावीतून शाळा सोडणाऱ्यांची आणि बारावीपर्यंतच शिक्षण घेणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढली.

पारदर्शक मूल्यमापन होणे जरूरी
पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना किमान इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय व्यवस्थित समजायला हवे आणि त्याचे पारदर्शक मूल्यमापन होणे जरूरी आहे. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण फार कठीण जाणार नाही असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार असून त्यात त्या विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.