RTO चा मोठा निर्णय! प्रवासी वाहनांमध्ये ‘ही’ सुविधा नसल्यास होणार दंडात्मक कारवाई

109

रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सरकारने सर्व प्रवासी वाहनांना स्पीड लॉक बसवणे अनिवार्य केले आहे. मात्र अजूनही अनेक वाहनांमध्ये स्पीड लॉक बसवलेले नाहीत. प्रवासी वाहनांमध्ये स्पीड लॉक न बसवल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे RTO विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे त्वरीत स्पीड लॉक बसवून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे असेही RTO प्रशासनाने सांगितले आहे.

( हेही वाचा : PMPML च्या ई- बस आगारातचं उभ्या; चार्जिंगअभावी प्रवाशांची गैरसोय)

स्पीड लॉक बसविणे अनिवार्य 

वेगावर नियंत्रण नसल्यास अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रवासी वाहनात स्पीड लॉक लावणे आवश्यक आहे. स्पीडगन ही प्रणाली अस्तित्वात आल्यापासून अधिक वेगाने वाहन चालवून होत असलेले अपघातांचे प्रमाण आता कमी झाले असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

परवान्याशिवाय प्रवासी वाहतूक केल्यास किंवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम ६६/१९२- अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन ५ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच तुमच्या वाहनांचे रजिस्ट्रेशन १२० दिवासांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. स्पीड लॉक न बसविणे व छेडछाड केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.