विमान प्रवास करताय? ७२ तास आधी RT-PCR चाचणी अनिवार्य! केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

जगभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळेच भारतासह अनेक देशांनी सावध भूमिका घेतली आहे. चीनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर झाल्यामुळे सर्व देशांमधील आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजूनही कोरोनाची चौथी लाट आलेली नाही परंतु कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात भारतीय आरोग्य मंत्रालयाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

( हेही वाचा : भिंवडीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा! १९ विद्यार्थी ताब्यात )

प्रवाशांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य

या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार चीन, सिंगापूर, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, थायलंड आणि जपानस येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोर्डिंगच्या ७२ तास आधी RTPCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.

चीन, हॉंगकॉंग, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड आणि जपान या ६ देशांमधून येणाऱ्या नागरिकांनी आपली RT-PCR चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here