केंद्र सरकारचा मोठा निर्णय! चीनसह ‘या’ ४ देशातून येणाऱ्या नागरिकांची RT-PCR चाचणी होणार

116

जगातील काही देशांमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे अनेक देशांनी पुन्हा एकदा कोरोना निर्बंध कठोर करण्यास सुरूवात केली आहे. भारतातही खबरदारी म्हणून चीनसह ५ देशांमधून येणाऱ्या नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( हेही वाचा :  धक्कादायक! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार)

एअर सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य

चीनमधील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेत भारत सरकारकडून नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात दाखल होण्यापूर्वी त्यांची सध्याची आरोग्य स्थिती सांगणे अनिवार्य करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशांनंतर चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या प्रवाशांना एअर सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली आकडेवारी 

भारतात शनिवारी २०१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ४ कोटी ४६ लाखांवर गेली आहे. देशात सध्या ३ हजार ३९७ सक्रिय कोरोना रुग्ण आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी ही आकडेवारी जारी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.