Musical Instruments : हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी बंद होणार ही अफवा

151
Musical Instruments : हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी बंद होणार ही अफवा
Musical Instruments : हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी बंद होणार ही अफवा

विविध संगीत वाद्य निर्मिती करणारी नावाजलेली संस्था हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढी तिचे दादरमधील दुकान बंद करत आहे, असा संदेश सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी वाद्यपेढीच्या मालक पद्मा दिवाणे यांनी त्याविषयी खुलासा केला आहे. हरिभाऊ विश्वनाथ वाद्यपेढीच्या शतकपूर्ती वर्षात अशा प्रकारे अफवा पसरल्याने मनस्ताप झाल्याची भावना दिवाणे यांनी व्यक्त केली. (Musical Instruments)

(हेही वाचा – Ganeshotsav 2024 : मुंबईत आतापर्यंत १२३७ मूर्तिकारांकडून मंडप परवानगीसाठी अर्ज)

प्रशस्त जागेत होणार स्थलांतर

हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनीच्या तीन शाखा आहेत. दादर, गिरगाव आणि प्रभादेवी अशी 3 भावांची ही दुकाने आहेत. यापैकी दादरचे दुकान आता प्रभादेवीला स्थलांतरित होणार आहे. दादरच्या दुकानासमोर फ्लाय ओव्हर झाल्यामुळे ते दुकान झाकले जाते. आता दादरच्या दुकानासमोर वाहनांच्या पार्किंगलाही जागा मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांना अवजड वाद्ये घेऊन वाहन पार्क केलेल्या ठिकाणापर्यंत जावे लागते. महत्त्वाचे म्हणजे दादरमध्ये वाढत जाणाऱ्या गर्दीमुळे, तसेच फेरीवाल्यांच्या आवाजामुळे ग्राहकांना वाद्य वाजवून त्याचा आवाज तपासून घेण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रभादेवीला अत्यंत प्रशस्त जागेत असलेल्या दुकानात दादर येथील दुकान स्थलांतरित करण्यात येणार आहे, असे पद्मा दिवाणे यांनी सांगितले. (Musical Instruments)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.