रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याच्या आरबीआयच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतल्याने रुपी बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाला चार आठवड्यांसाठी अर्थात १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या निर्णयाविरोधात बँकेने केंद्रीय अर्थ मंत्रालयात दाद मागितली.
बँकेने अर्थ मंत्रालयाकडे दाद मागितली
रुपी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने सर्वंकष बंधने घातली असून बँक अवसायनात काढण्याचा आदेश दिला होता. हा आदेश काढताना रिझर्व्ह बँकेने सहा आठवड्यांचा अवधी दिला होता. ही मुदत नुकतीच संपली आहे. मात्र, या आदेशाविरुध्द तसेच आदेशास अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी बँकेने अर्थ मंत्रालयातील सहसचिव यांच्यापुढे अपील दाखल केले आहे. बँक अवसायनात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाविरुद्ध बँकेने उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. तसेच बँकेने अंतरिम स्थगिती मिळण्यासाठी रिट अर्जही दाखल केला होता. बँकेने दाखल केलेल्या या रिट अर्जावर न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांच्यापुढे बुधवारी, २१ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली, गुरुवारी, २२ सप्टेंबर रोजी न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार रुपी बँक अवसायनात आणण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या रुपी बँक अवसायनात काढण्याच्या आदेशास पुढील चार आठवडे म्हणजे १७ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
(हेही वाचा ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी गरबा उत्सवात मुसलमानांना प्रवेश देण्यास विरोध)
Join Our WhatsApp Community