Rupee Declining : भारतीय रुपयांत सातत्याने का होतेय घसरण?

Rupee Declining : आणखी ६ महिन्यांत भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ८५ पर्यंत घसरेल असा अंदाज आहे. 

97
Rupee Declining : भारतीय रुपयांत सातत्याने का होतेय घसरण?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय रिझर्व्ह बँक करत असलेल्या प्रयत्नांनंतरही भारतीय रुपयातील घसरण सुरूच असून आणखी ६ महिन्यांनी एका अमेरिकन डॉलरसाठी आपल्याला तब्बल ८५ रुपये मोजावे लागतील असं रॉयटर्सच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा जरी अंदाज असली तरी रुपयाची वाटचालही त्याच दिशेनं सुरू असलेली दिसत आहे. चालू तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर ५.४ टक्क्यांवर होता असं नुकतंच समोर आलं आहे. त्यानंतर ही रुपयाची बातमी आली आहे. (Rupee Declining)

६ डिसेंबरला रिझर्व्ह बँकेची पतधोरणाची बैठक आहे. आणि यावेळीही रेपो दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे अमेरिकेतील नवीन ट्रम्प प्रशासनाने देशाबाहेरून आयात कमी करण्यासाठी अनेक वस्तूंच्या आयतीवरील कर वाढवले आहेत. खासकरून शेतमालावरील आयातीचा दर आता अमेरिकेत चढा राहणार आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होताना दिसतो आहे. (Rupee Declining)

(हेही वाचा – काँग्रेस खासदार Abhishek Manu Singhvi यांच्या सीटवर नोटांचे बंडल; राज्यसभेत गदारोळ)

यावर्षी ऑक्टोबर महिन्यापासून रिझर्व्ह बँकेनं रुपया सावरण्यासाठी देशातील परकीय गंगाजळीतील तब्बल ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. असं असतानाही रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत सध्या ८४ रुपये ७४ पैशांवर आहे. अमेरिकेचं आयात कर वाढवण्याचं धोरण तसंच राहिलं तर भारतातील महागाई दर आणखी वाढणार आहे आणि त्याचा परिणामही रुपयावर होणार आहे. (Rupee Declining)

ज्या कालावधीत भारताने ५० अब्ज अमेरिकन डॉलर खर्च केले, त्याच कालावधीत भारताबाहेरून भारतात फक्त १३ अब्ज अमेरिकन डॉलरची भर पडली. देशातील उत्पादन क्षेत्राला लागलेली ओहोटी आणि बाहेरून भारतीय शेतमाल आणि इतर मालाची कमी झालेली मागणी यामुळे रुपयावर असा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. (Rupee Declining)

(हेही वाचा – Bitcoin Hits All Time High : बिटकॉईनचा जागतिक स्तरावर १,००,००० अमेरिकन डॉलरचा नवा उच्चांक)

एखाद्या चलनाचा दर ठरवताना दोन चलनांमध्ये किती आंतरराष्ट्रीय व्यापार झाला ते गृहित धरलं जातं. म्हणजे भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात आयातीपेक्षा जास्त असेल तर भारतीय रुपया मजबूत होईल. उलट भारताकडून आयात जास्त आणि निर्यात कमी असेल तर रुपया त्या चलनाच्या विरोधात घसरेल. (Rupee Declining)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.