- ऋजुता लुकतुके
कोव्हिडनंतर भारतीय विमान वाहतूक हळू हळू सुधारत असताना अचानक डॉलरसमोर ढासळता रुपया आणि इंधनाच्या पुन्हा वाढलेल्या किमतींनी हे क्षेत्र आणि पर्यायाने विमान कंपन्या हैराण झाल्या आहेत. एअर इंडियाचे सीसीओ निपुण अगरवाल यांनी यावर सर्वप्रथम भाष्य केलं आहे. ‘रुपया जितका घसरेल, तितका आमचा नफा आणि तिकिटांच्या किमतीवर परिणाम होतो. एअर इंडिया जगभरात प्रवास करते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय तिकिटं परकीय चलनांत विकता येतात. पण, देशांतर्गत मार्ग आणि देशी प्रवासी यांच्या बाबतीत ते शक्य होत नाही. त्याचा फटका विमान कंपन्यांना बसत आहे,’ असं अगरवाल पत्रकारांशी विशेष बातचित करताना म्हणाले. (Rupee vs US Dollar)
रुपया घसरण्यामागे तेलाच्या वाढलेल्या किमती हे ही एक कारण आहे आणि त्याचाही फटका विमान कंपन्यांना बसतोच आहे. कारण, आंतरारष्ट्रीय बाजारात कच्चं तेल आता ८१ डॉलर प्रती बॅरलवर पोहोचलंय आणि त्यामुळे विमानांसाठी लागणारं इंधनही महाग होतंय. असा दुहेरी फटका विमान कंपन्यांना बसतोय. (Rupee vs US Dollar)
(हेही वाचा – BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)
अर्थतज्ज्ञांनीही तेलाच्या किमती वाढण्याची गंभीर इशारा दिला आहे. यामुळे देशात महागाई वाढेल आणि त्याचा परिणाम वस्तू आणि सेवांची मागणी कमी होण्यात होईल. त्यामुळे विमान प्रवासाची मागणीची कमीच होण्याची शक्यता आहे. ‘विमान कंपन्यांचा नफा त्यामुळे कमी होतो आणि अशा दडपणाच्या परिस्थितीत काम करणंही कठीण होऊन बसतं. आधीच खर्च वाढलेला आणि त्यात प्रवासी संख्या घटली तर आगामी काळ विमान कंपन्यांसाठी आव्हानात्मक असेल,’ असं अगरवाल यांनी बोलून दाखवलं. (Rupee vs US Dollar)
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे आणि १३ जानेवारीला ही किंमत चक्क ८६.३९ वर पोहोचली आहे. म्हणजे एका डॉलरसाठी ८६.३९ रुपये मोजावे लागत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत याचे दृश्य दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. (Rupee vs US Dollar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community