Rupee vs USD : अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नवा नीच्चांक, रुपया का घसरतोय?

अमेरिका आणि इतर देशांमधील व्यापारी युद्धाचा फटका भारतीय रुपयालाही बसतो आहे.

194
Rupee vs USD : अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नवा नीच्चांक, रुपया का घसरतोय?
Rupee vs USD : अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नवा नीच्चांक, रुपया का घसरतोय?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय रुपयाची घसरण आंतरराष्ट्रीय चलन बाजारात अजून थांबण्याचं नाव घेत नाहीए. सोमवारी (३ फेब्रुवारी) रुपयाने अमेरिकन डॉलरच्या (Rupee vs USD) तुलनेत नवा नीच्चांक स्थापन करताना ८७ रुपयांची पातळीही सोडली आहे. अमेरिका व इतर देशांमध्ये सुरू होत असलेलं व्यापारी युद्ध, वाढती महागाई यांचा परिणाम भारतीय रुपयावर दिसून येत आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी परदेशातून येणाऱ्या मालावर जास्तीचं आयात शुल्क लादल्यावर त्या देशांनीही अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचं ठरवलं. त्यामुळे अमेरिकेतून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क वाढवलं. चीन, मेक्सिको आणि ब्राझील या देशांचा यात समावेश आहे. त्यामुळे जगभरात आता अघोषित व्यापार युद्ध सुरू झालं आहे. आणि परिणामी, आशियाई देशांमध्ये चलनातील घसरण सुरू झाली आहे.

कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली. आता डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय एका महिन्यांसाठी स्थगित केला आहे. पण, त्यामुळे रुपयाची घसरण इतक्यात थांबणारी नाही. (Rupee vs USD)

(हेही वाचा – BMC Budget 2025 : मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर)

डॉलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच ८७ चा आकडा पार केला आहे. मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरु आहे. खरंतर मार्चपर्यंत रुपया ८७ रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त होत होता. पण, फेब्रुवारीच्या तिसऱ्याच दिवशी डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांकी पातळी गाठली आहे. ८७.२६ हा नवीन नीच्चांक भारतीय रुपयाने स्थापन केला आहे. (Rupee vs USD)

अमेरिकेच्या सुधारित आर्थिक परिस्थितीत अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाली आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेतील उच्च उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांसाठी अमेरिका आकर्षक ठरत आहे. नव्या अमेरिकन सरकारच्या धोरणांबाबत अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे. (Rupee vs USD)

सोबतच, जगातील भूराजकीय तणावांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता कायम आहे. रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्व संकट, लाल समुद्रातील शिपिंगसारख्या समस्यांमुळे देखील रुपया घसरला आहे.

(हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह पुढील तपासणीसाठी बंगळुरूमध्ये दाखल, चॅम्पियन्स करंडक खेळणं अवघड?)

परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भांडवली बाजारातून हात आखडता घेतला आहे. कमकुवत रुपयामुळे आयात बिलात वाढ, कारण आयातदार डॉलरमध्ये पैसे देतात. खाद्यतेल, डाळी, खते, तेल आणि गॅस यांच्या आयातीचा खर्च वाढतो. भारत आपल्या मागणीच्या ८० टक्के तेल आयात करतो. त्यामुळे भारताची परकीय गंगाजणी आयातीवर वारेमाप खर्च होत आहे. त्यामुळे तेल आणि गॅसच्या आयातीवर मोठे परिणाम होणार आहेत. रुपया कमकुवत होणे म्हणजेच महाग आयात ज्याचे परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरते. (Rupee vs USD)

रुपयातील कमजोरी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी युद्धाचं वातावरण यांचा फटका भारतासह आशियाई शेअर बाजारांवरही जाणवत आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली आहे. आणि शेअर बाजारात दीड टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. (Rupee vs USD)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.