Russia-Ukraine War : भारताच्या औषध कंपनीच्या गोदामावर रशियाने डागले क्षेपणास्र; भारतीय दुतावासाची एक्सवर पोस्ट

78

युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर रशियाने क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. या हल्ल्याबाबत रशियाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. (Russia-Ukraine War)

युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसूमच्या गोदामावर रशियाने आज क्षेपणास्त्र हल्ला केला. भारताबरोबर खास मैत्री असल्याचे सांगत मॉस्कोकडून (Moscow) सातत्याने भारतीय व्यवसायांना लक्ष्य केले जात आहे. वृद्ध आणि लहान मुलांसाठी बनवण्यात येणाऱ्या औषधांना नष्ट करण्यात आले आहे, अशी पोस्ट युक्रेनमधील भारतीय दुतावासाने एक्सवर केली आहे. (UKR Embassy in India)

(हेही वाचा – West Bengal Waqf Law Violence : बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुसलमानांचा हिंसाचार सुरुच; हिंदु पिता-पुत्राची हत्या)

भारतीय व्यवसायांना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. युक्रेनममधील भारतीय दुतावासाने या संदर्भात माहिती दिली आहे.

कुसुम हेल्थकेअरच्या गोदामात काय आहे ?

कुसुम हेल्थकेअरच्या (Kusum Healthcare Products) या गोदामात मानवी गरजांसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय साहित्य ठेवण्यात आले होते. कीवने अद्याप जीवितहानी किंवा नुकसानीची माहिती जाहीर केलेली नाही, परंतु आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन म्हणून या हल्ल्याचा निषेध केला आहे.

कुसुम (Kusum Pharma Ukraine) हा एक औषध कंपन्यांचा एक बहुराष्ट्रीय गट आहे. कुसुममध्ये युक्रेन, भारत, मोल्दोव्हा, कझाकस्तान, उझबेकिस्तान, फिलीपिन्स, म्यानमार, मेक्सिको आणि केनियामध्ये २००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कुसुमद्वारे चार आधुनिक उत्पादन सुविधा दिल्या जातात. त्यापैकी तीन सुविधा भारतात असून एक युक्रेनमध्ये आहे.

रशियन ड्रोनने कीवमधील एका मोठ्या औषधांच्या गोदामाला पूर्णपणे उद्ध्वस्त केले, वृद्ध आणि मुलांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा साठा जाळून टाकला. युक्रेनियन नागरिकांविरुद्ध रशियाची दहशतवादाची मोहीम सुरूच आहे,” असे मार्टिन यांनी x वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Russia-Ukraine War)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.