रशिया-युक्रेन युद्ध दीर्घकाळ सुरु आहे. यात रशियाला अमेरिकासह नाटो सदस्य शत्रूसमान बनले आहेत. त्यामुळे रशियाने ‘मेटा’ ला दहशतवादी म्हणून घोषित केले. यात रशियन सरकारने मार्क झुकरबर्ग यांच्या कंपनीचा दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. ‘मेटा’ ही फेसबुकची मूळ कंपनी आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरेकी क्रियाकलाप केल्याचा आरोप
मार्चमध्ये रशियन सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ब्लॉक केले होते. मॉस्कोच्या एका न्यायालयाने मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरेकी क्रियाकलाप केल्याचा आरोप केला होता. मेटा युक्रेनमधील सोशल मीडिया युजर्सना रशियन लोकांविरुद्ध हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा कंटेट पोस्ट करण्याची परवानगी देत असल्याचा आरोप केला होता. META च्या वकिलाने नंतर आरोप फेटाळून लावले होते. विशेष म्हणजे, या वर्षाच्या सुरुवातीला मार्क झुकरबर्गला रशियामध्ये प्रवेश करण्यास बंदी असलेल्या 963 प्रमुख अमेरिकन व्यक्तींच्या यादीत सामील करण्यात आले होते.
(हेही वाचा शिवसेनेच्या इतिहासात ढाल-तलवार चिन्हाचे काय आहे महत्व?)
Join Our WhatsApp Community