गेल्या वर्षभरापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात संघर्ष सुरु आहे. यामध्ये अनेक देशांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र भारताने दोन्ही देशांना शांतीचा मार्ग निवडा असा सल्ला देऊन आपली तटस्थ भूमिका स्पष्ट केली. मात्र आता युक्रेनच्या उप परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला या संघर्षामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे.
सोमवारी, १० एप्रिल २०२३ रोजी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम उपमंत्री एमिने झापरोवा यांनी नवी दिल्ली येथील थिंक टॅंक या कार्यक्रमातून आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी भारताला ‘विश्वगुरू’ असे संबोधून भारताने रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षात युक्रेनची बाजू घ्यावी अशी विनंती केली. त्याचसोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची इच्छा देखील बोलून दाखवली.
(हेही वाचा अजित पवार घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट; चर्चेला उधाण, नेमके कारण काय?)
“युक्रेनला खरोखरच भारताने मदत करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. तसेच भारत आणि युक्रेन यांच्यामध्ये सखोल, व्यावहारिक आणि संतुलित असे संबंध जोडण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही स्वतःहून मदतीसाठी आणि चांगल्या संबंधांसाठी भारताचं दार ठोठावत आहोत, आता भारताने दार उघडावं की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. युक्रेनशी नवीन संबंध निर्माण करण्यासाठी काही वेळ लागू शकतो मात्र भारत हा एक दूरदृष्टी ठेवणारा देश आहे. त्यामुळे युक्रेनसोबतच्या मैत्रीचा त्यांनी विचार करावा. तसेच रशियाला जे-जे मदत करत आहेत ते एक अतिशय चुकीचा आदर्श घालून देत आहेत, असेही एमिने झापरोवा यांनी म्हटले. एमिने झापरोवा या रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून भारताला भेट देणाऱ्या पहिल्या अधिकारी आहेत.
Join Our WhatsApp Community