युक्रेन-रशिया युद्ध दिवसेंदिवस लांबतच चालले आहे. युक्रेनचा पराजय होत नाही. त्यामुळे रशियाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. रशियावर नाटो आणि युरोपियन देशांनी निर्बंध लावले आहेत. म्हणून रशिया आता व्यापारासाठी नवीन ग्राहकाचा शोधात आहे. त्यासाठी आता रशिया हा भारताकडे पाहत आहे. रशिया भारताला स्वस्त दरात तेल विकण्यास तयार आहे.
३५ डॉलर प्रति बॅरल
रशियाने भारताला ३५ डॉलर प्रति बॅरल इतक्या स्वस्त दराने कच्चे तेल देऊ केले आहे. रशियाने भारताला उरल्स ग्रेडचे कच्चे तेल देऊ केले आहे. हे कच्चे तेल भारताला सवलतीच्या दरात म्हणजेच ३५ डॉलर प्रति बॅरलने मिळणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात याच कच्च्या तेलाचे दर १०० रुपये प्रति बॅरलच्या वर आहेत. त्यामुळे भारतासाठीही सवलतीच्या दरातील कच्चा तेलाची ऑफर फायदेशीर मानली जात आहे. रशिया भारताला कच्चा तेलाच्या निर्यातीची सुरुवात म्हणून यंदाच्या वर्षी १५ मिलियन बॅरल कच्चे तेल देऊ इच्छित आहे. याबाबत सरकारच्या पातळीवरही चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे.
(हेही वाचा महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय?)
रशियाच्या ऑफरने फायदा
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले गेले आहेत. अशा स्थितीत आशियातील दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश असलेल्या भारताने रशियाकडून कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. असे असले तरी अद्यापही भारताच्या आयातीत आखाती देशांसह अमेरिकेचा मोठा वाटा आहे. मात्र आता रशियाच्या ऑफरने भारताला मोठा फायदा होऊ शकतो. युरोपमधून रशियाच्या कच्चा तेलाच्या खरेदीवर निर्बंध आल्याने सध्या आशियात चीन आणि भारत रशियाचे मोठे ग्राहक म्हणून समोर येत आहेत. विशेष म्हणजे रशियाने कच्चा तेलाच्या आर्थिक व्यवहारासाठी रुपये आणि रुबलचाही पर्याय ठेवला आहे. यावर रशियाचे परराष्ट्र मंत्री २ दिवसीय भारत दौऱ्यावर येतील तेव्हाच चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.
Join Our WhatsApp Community