रशियाने गुरुवारी युक्रेनवर आपला सर्वात भीषण हल्ला केला. (Russia Ukraine War) रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील ह्रोझा गावावर रॉकेट डागले. या हल्ल्यात तेथील कॅफे आणि स्टोअरमध्ये उपस्थित किमान 51 नागरिक ठार झाले. तेथे अनेक जण जखमी झाले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरत संताप व्यक्त होत आहे. (Russia Ukraine War)
(हेही वाचा – ICC ODI World Cup : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन फिरकी गोलंदाज खेळवणार?)
इस्कंदर मिसाईलने हल्ला केला
युक्रेनचे अंतर्गत व्यवहारमंत्री इहोर क्लिमेंको यांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी कॅफेमध्ये सुमारे 60 लोक होते. ते गावातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांनंतर प्रार्थनेसाठी उपस्थित होते. झेलेन्स्कीचे चीफ ऑफ स्टाफ आंद्री येरमाक आणि खार्किवचे गव्हर्नर ओलेह सिनिहुबोव्ह यांनी सांगितले की, मृतांमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. रशियाने इस्कंदर क्षेपणास्त्राने या गावावर हल्ला केला होता. युक्रेनियन मीडियाने रक्ताने माखलेल्या मृतदेहाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
क्रूर रशियन गुन्हा – झेलेन्स्की
जेव्हा झेलेन्स्की आपल्या देशाला पाठिंबा मिळवण्यासाठी 50 युरोपियन नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्पेनमध्ये गेले असतांना हा हल्ला झाला आहे. ह्रोझा गावात झालेल्या हल्ल्याचा क्रूर रशियन गुन्हा आणि पूर्णपणे हेतुपुरस्सर दहशतवादी कृत्य, अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गेल्या हिवाळ्यात, रशियाने सतत क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसह युक्रेनची वीज व्यवस्था आणि इतर अनेक गंभीर पायाभूत सुविधांना लक्ष्य केले, ज्यामुळे देशभरात वारंवार वीज खंडित होत आहेत.
व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी अधिक पाश्चात्य समर्थनाची मागणी केली आणि म्हटले की रशियन दहशतवाद थांबविला पाहिजे. “रशियाला अशा दहशतवादी हल्ल्यांची फक्त एकाच गोष्टीसाठी गरज आहे. संपूर्ण जगासाठी नवीन आदर्श बनवण्यासाठी रशिया आक्रमकपणे नरसंहार करत आहे”, झेलेन्स्की यांनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Russia Ukraine War)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community