Russia Ukraine War: भारताच्या सुरक्षेसाठी रशियाने घेतला मोठा निर्णय!

116

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक अडकलेले आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाली होती. यानंतर रशियाने घेतलेल्या निर्णयामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी ६ तास हल्ले थांबण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे.

( हेही वाचा : भारतीय मायदेशी येईपर्यंत ‘ऑपरेशन गंगा’ सुरू राहणार! विमानतळावर विशेष सुविधा )

रशिया ६ तास हल्ले थांबवणार

खारकिव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराकडून मानवी ढाल बनवल्याचा आरोप होत असतानाच, बुधवारी रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी नरेंद्र मोदींनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधानांना सांगितले होते की, रशिया मदत करण्यास तयार आहे. रशियन सैन्य यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारतीय विद्यार्थ्यांच्या तात्काळ सुटकेसाठी रशियन लष्कराकडून खारकिव्ह ते रशियापर्यंत सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. यासाठी रशिया ६ तास हल्ले थांबवणार आहे.

भारतीयांना दिलासा

युद्ध सुरू झाल्यापासून अमेरिका किंवा चीन हे बलाढ्य देश आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अपयशी ठरत असतानाच, खारकिव्ह येथील युद्ध सहा तास थांबवण्यात भारताला यश आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच बाहेर काढले जाईल असे आदित्य राज कौल यांनी ट्विट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.